Wednesday, April 15, 2026
Homeअपघात..भुसावळहून पुणे कडे जाणारी ट्रॅव्हल्स बसला गारखेडा येथे अपघात

भुसावळहून पुणे कडे जाणारी ट्रॅव्हल्स बसला गारखेडा येथे अपघात

जामनेर – दि.१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क )जामनेर महामार्गावरील गारखेडा गावाजवळ भुसावळ येथून पुणे कडे जाणाऱ्या संगीतम ट्रॅव्हल्स (MH -19 CY 2224) पलटी झाल्याने अपघात रात्री ९.३० वाजेच्या सुमारास झाल्याची घटना घडली.अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत,प्रवाशांना जामनेर,शासकीय रुग्णालय,व भुसावळ येथे तात्काळ उपचारासाठी हलविन्यात आले आहे.या साठी स्थानिक ग्रामस्थानी मदत करीत प्रवाश्यांना उपचारासाठी हलविण्यात सहकार्य केले.या अपघाती घटनेत ही भुसावळ येथून पुणे कडे जाणारी ही संगितम ट्रॅव्हल्सची बस रस्त्याच्या कडेला उलटल्याने पलटी झाली.या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे कळते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या