जामनेर :- दि.२४ (धर्मसाथी लाईव्ह न्यूज)
भक्ती,शास्त्रीय नृत्य आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर संगम जामनेर येथे अनुभवायला मिळाला.शिवशक्ती कथक संस्थानच्या विद्यार्थिनींनी सोनबर्डी येथे भक्तिमय नृत्यसेवा सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
गणेश वंदनेने सुरू झालेल्या या नृत्यसेवेत देवी, महादेव तसेच विठ्ठल-रुक्माई यांच्या भक्तिमय रचनांचे कथकच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. तालबद्ध पदन्यास, आकर्षक हस्तमुद्रा, भावपूर्ण अभिनय आणि घुंगरांच्या नादातून विद्यार्थिनींनी भक्तीची अनुभूती उपस्थितांपर्यंत पोहोचवली.
या नृत्यसेवेत पूजा कुलकर्णी, अनुश्री सावकारे, स्वरा चौधरी आणि कृष्णाई रेंबोटकर यांनी सहभाग घेतला.
