Wednesday, April 15, 2026
Homeजामनेर परिसर...ऑर्किड नेचर फाऊंडेशन जळगाव तर्फे वृक्षारोपण.

ऑर्किड नेचर फाऊंडेशन जळगाव तर्फे वृक्षारोपण.

जळगांव – दि.३० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
रविवार दि.२९ रोजी ऑर्किड नेचर फाऊंडेशन तर्फे ५ ते ६ फुट उंचीच्या दाट सावली देणाऱ्या भारतीय वृक्षांची एकूण ७५ रोपे लावण्यात आली. गाडेगाव येथील श्री तोताराम महाराज समाधी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.फाऊंडेशनचे अध्यक्ष आर.एन.कुलकर्णी,उपाध्यक्ष आर.ए.पाटील,कोषाध्यक्ष नितीन अट्रावलकर, व इतर पदाधिकारी दिलिप भारंबे,डॉ.विकास पाटील,किशोर महाजन, एन.सी.वाघ,अविनाश भोळे,शशिकांत पाटील,विनय काळे,दिपक तांबोळी,अतुल कोल्हे,सचिव सौ. सुनीता महाजन,सौ.माधुरी कोल्हे,सौ.अर्चना अट्रावलकर,सौ.आरती कुलकर्णी,तोताराम महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष हरीभाऊ राणे,प्रकाश भारंबे आदी सर्वांच्या उपस्थितीत आणि गाडेगावचे भारंबे कुटुंबीयाच्या सहकार्याने कालचे वृक्षारोपण करण्यात आले.स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने खड्डे खणण्याची पूर्वतयारी भारंबे यांनी आदल्या दिवशीच करून ठेवली होती.तसेच अध्यक्ष आर.एन कुलकर्णी यांनी सामाजिक वनीकरण विभाग,जळगाव यांच्या नर्सरीतून रोपांची खरेदी करून दोन दिवस आधीच गाडेगाव येथे पोहोचवली होती.काल सकाळी ८:०० वाजता जळगाव हून निघून गाडेगावच्या तोताराम महाराज समाधी मंदिर परिसरात ९:०० वाजता पोचल्यावर प्रत्येक सदस्यांनी आणि उपस्थित ग्रामस्थांनी २-२ रोपे लावली. त्यानंतर दिलिप भारंबे सरांकडून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.सकाळी दोन तास प्रदुषण विरहीत वातावरणात घालवली. गावातील ग्रामपंचायत कार्यालयास भेट देण्यात आली.अत्याधुनिक इमारत प्रगतीची साक्ष देत आहे.स्वतंत्र कार्यालये,सुसज्ज सभागृह,गावात सर्वत्र सिमेंटच्या ब्लॉकचे रस्ते हे पाहून पदाधिकारी,सभासद थक्क झालो.

गावात ११६ वर्षे जूने लाकडी विठ्ठल मंदिर आहे.मंदिरास भेट देऊन श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले.मंदिराच्या सभामंडपात थंड वातावरणाचा अनुभव घेतला.वास्तुकलेची उत्कृष्ट कलाकृती बघायला मिळाली.प्रल्हाद बळीराम भारंबे आणि समाधी ट्रस्टचे कार्यकारिणी सदस्य रामानंद वारके,शरद भारंबे,पांडुरंग बाक्षे,डॉ.किशोर भारंबे,अरूण पाटील,नितीन पाटील आणि सागर व सौ.दिशा भारंबे या सर्वांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या