बार्डोली – दि.२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
धुळे – सुरत महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसेसचा अपघात होऊन ७ प्रवाशांचा लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना घडली.आज महाराष्ट्र राज्य परिवहनच्या जामनेर डेपोची जामनेर–सुरत बस आणि धुळे डेपोची धुळे–सुरत बस यांचा बारडोली पासून सुमारे १० कि.मी. अंतरावर उवा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात जामनेर डेपोच्या बसला आग लागून बस पूर्णपणे जळून खाक झाली असल्याची माहिती मिळाली आहे.प्राथमिक माहितीनुसार ७ प्रवाशांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.त्यात जळगाव जिल्ह्यातील एकाचा मृत्यू त्या घटनेत झाला आहे.मृतांची ओळख पटविणे अत्यंत कठीण झाले आहे.
या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून तातडीने प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.तसेच जखमी झालेल्या नागरिकांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
सध्या बचावकार्य व इतर प्रवाशांचा शोध सुरू असून, जखमी व मृतांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.इतर जखमी प्रवाशांना उपचारासाठी व्यारा, बारडोली तसेच सुरत येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.इतर जखमी प्रवाशांना उपचारासाठी व्यारा,बारडोली तसेच सुरत येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
समाजातील सर्व बांधवांना आवाहन आहे की,जर या दोन्ही बसमध्ये आपल्या समाजातील कोणी प्रवास करत असेल किंवा या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध असेल,तर कृपया खालील संपर्क क्रमांकांवर तात्काळ कळवावे,जेणेकरून गरजू व्यक्तींना योग्य मदत व मार्गदर्शन करता येईल.संपर्क सूत्र – बारडोली
जनार्दन सूर्यवंशी –98253 62186,राकेश लोहार – 98259 08929,सतीश लोहार–99793 49097 यांचेशी संपर्क साधावा.
