Thursday, October 29, 2026
Homeक्राईमएम.आय.डी.सी. हद्दीतून चोरीला गेलेले, हरवलेले १८ मोबाईल मुळ मालकांना परत ..

एम.आय.डी.सी. हद्दीतून चोरीला गेलेले, हरवलेले १८ मोबाईल मुळ मालकांना परत ..

जळगाव – दि.२८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतून मागील काळात हरवलेले,चोरीला गेलेले एकूण १८ मोबाईल आज वरिष्ठ पोलिस अधिकारी नितीन गणापुरे,पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या हस्ते ताब्यात देण्यात आले.एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने उत्तम कामगिरी करत हस्तगत केलेले अंदाजे ३ लाख रुपये किमतीचे १८ मोबाईल नागरिकांना आज दि.२८ रोजी दुपारी एम.आय.डी.सी पोलिस स्टेशन आवारात ताब्यात देण्यात आले. सी.ई.आय.आर. पोर्टल द्वारे तसेच तांत्रिक विश्लेषण आधारे हे १८ मोबाईल हस्तगत करण्यात आले होते.दिपावली पर्व सुरू होण्या आधीच पोलिस विभागाने तत्पर कारवाई करत ही भेट दिल्याने त्याचा आनंद या नागरिकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वहात होता.सर्व मोबाईल मुळ मालकांनी या प्रसंगी वरिष्ठ पोलिस अधिकारी नितीन गणापूरे एमआयडीसी पो.स्टे.निरीक्षक बबन आव्हाड यांचे मनपूर्वक आभार मानले व पोलिस विभागाच्या कर्तव्याचे बाबत समाधान व्यक्त केले.एक वर्षा पूर्वी जल पर्यटन केंद्रातून हरवलेला मोबाईल सुरक्षितरित्या मला आज ताब्यात मिळाला. जेव्हा पोलिस स्टेशन मधून या बाबत फोन द्वारे निरोप मिळाला.तेव्हा परिवाराला आनंद झाला.यातून पोलिस स्टेशन कामकाजाबाबत आमचा विश्वास आणखी वाढला असल्याची प्रतिक्रिया व्यवसायाने रंगकाम करणाऱ्या सचिन राजेंद्र जोशी यांनी धर्मसाथी लाईव्हशी बोलताना व्यक्त केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या