Thursday, October 29, 2026
Homeजळगांव शहरउद्यमीतर्फे दिवाळी निमित्त ब्राह्मण सभेत भव्य प्रदर्शनाचे आयोजन ..

उद्यमीतर्फे दिवाळी निमित्त ब्राह्मण सभेत भव्य प्रदर्शनाचे आयोजन ..

जळगाव – दि.२८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) येथील उद्यमी महिला नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे बळीराम पेठेतील ब्राह्मण सभेच्या सभागृहात शुक्रवार ३० ऑक्टोंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत दिवाळीनिमित्त प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.घरगुती व छोट्या स्वरूपात उद्योग – व्यवसाय करणाऱ्या महिला आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना पाठबळ मिळावे या उद्देशाने उद्यमी पतसंस्थेतर्फे दरवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.

शुक्रवार ३० रोजी सकाळी ११ वाजता महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून प्रदर्शनात सर्व नागरिकांसाठी प्रवेश विनामूल्य व खुला आहे.मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट देऊन सहभागी महिलांना प्रोत्साहित करावे असे पतसंस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या