Thursday, October 29, 2026
Homeजळगांव शहरसुरभीची कोजागिरी उत्साहात..

सुरभीची कोजागिरी उत्साहात..

जळगाव – दि.२९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) सुरभी बहुुद्देशिय महिला मंडळाची कोजागिरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलमध्ये घेण्यात आली. सुरूवातीला अध्यक्षा सौ.स्वाती कुळकर्णी, मानसी जोशी, निलिमा नाईक ह्यांच्या हस्ते भुलाबाईचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रीसुक्त आवर्तन व भुलाबाईचे गाणे घेण्यात आले.सुरवातीला अध्यक्षा सौ स्वाती कुळकर्णी ह्यांनी प्रस्ताविक केले.नंतर अंताक्षरी कार्यक्रम घेण्यात आला. अंताक्षरी कर्यक्रमात विजेत्या स्पर्धकांची नावे,प्रथम जोडी-निशा गट-अपर्णा कुळकर्णी, अनुप्रिता बापट,द्वितीय जोडी-शर्वरी गट-मेघा जोशी,प्रांजली शिरवळकर तृतीय जोडी-यामिनी गट-प्रणिता कुळकर्णी, आरती दाडकर, उत्तेजनार्थ-रजनी गट-आसावरी जोशी, रंजना शूर. सरप्राईझ बक्षिसे शुभांगी जोशी,निता कुलकर्णी,योगिनी राव,स्वाती टेनी,अमिता जोशी,ह्यांना मिळाली .सौ.अविता जोशी,मानसी जोशी, सौ आशा जोशी,पूनम जोशी ह्यांनी अंताक्षरी स्पर्धेचे नियोजन केले.भुलाबाईची गाणी,बजर राउंड, पोटली राउंड,अशा वेगवेगळे ५ राउंड घेण्यात आले. अध्यक्षा सौ स्वाती कुळकर्णी ह्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.उपस्थित महिलांनी सुद्धा गाण्यांचा आनंद घेतला.ह्यावेळी उपस्थित महिलांनी चंद्र,तारे,कोजागिरी ह्यावर उखाणे घेतले.सूत्रसंचालणं मानसी जोशी व सौ अविता जोशी ह्यांनी केले. भुलाबाईच्या गाण्याने व भुलाबाईचा खाऊ ओळखून, तसेच नाश्ता व दुधाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमासाठी निलिमा नाईक,सौ.अश्विनी जोशी,सौ मेघा नाईक,पूनम जोशी,सुनीता सातपुते,सौ.आशा जोशी,सौ स्मिता बंगाली,सौ रेवती शेंदुर्णीकर,सौ.संजीवनी नांदेडकर,सौ प्रज्ञा जोशी,सौ माधुरी कुलकर्णी सौ मोना जोशी तसेच ज्येष्ठ नागरिक संघ व देवेंद्र मोरदे ह्यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या