Thursday, October 29, 2026
Homeजळगांव शहरसेवा भावी नेतृत्व मनीष झवर यांची 'अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा' कार्यसमिती सदस्यपदी...

सेवा भावी नेतृत्व मनीष झवर यांची ‘अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा’ कार्यसमिती सदस्यपदी निवड

जळगाव (धर्मसाथी मीडिया नेटवर्क):माहेश्वरी समाजासोबतच नवी पेठ गणेश मंडळ आणि इतर सामाजिक कार्यांत सदैव सक्रिय असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ,सेवाभावी नेतृत्व मनीष श्यामसुंदर झवर यांची ‘अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा’ च्या कार्यसमिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जळगावसह संपूर्ण माहेश्वरी समाज बांधवांमध्ये आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक सामूहिक विवाह आणि परिचय मेळाव्यांच्या यशस्वी आयोजनात मनीष झवर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या ते ‘श्री जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समिती’चे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असून, गेल्या अनेक वर्षांपासून युवा संघटन आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी हक्काचा माणूस म्हणून धावून जाण्याची त्यांची वृत्ती, उत्तम संघटनात्मक कौशल्ये आणि सेवाभाव यामुळे त्यांची ही निवड अत्यंत योग्य आणि पदाला साजेसी असल्याचे मत व्यक्त होत आहे.

मनीष झंवर यांच्या निवडीची घोषणा होताच जळगावमधील माहेश्वरी समाजातील अनेक मंडळे, संस्थांचे प्रमुख, ज्येष्ठ नागरिक, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ही निवड म्हणजे त्यांनी गतकाळात निस्वार्थी बुद्धीने केलेल्या सामाजिक योगदानाचा आणि निष्ठेचा गौरव असल्याची भावना समाज बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. आगामी गौरवशाली कार्यकाळासाठी आणि भावी वाटचालीसाठी त्यांना सर्व स्तरांतून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या