Friday, June 5, 2026
Homeजळगांव शहरसुरभी व श्री सिद्धिविनायक महिला मंडळातर्फे श्री विष्णू सहस्र नाम पठनाला सुरवात..

सुरभी व श्री सिद्धिविनायक महिला मंडळातर्फे श्री विष्णू सहस्र नाम पठनाला सुरवात..

जळगांव – दि.१९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) अधिक मासा निमित्त सुरभी व श्री सिद्धिविनायक महिला मंडळा तर्फे श्री विष्णूसहस्र पठण पठणाला ला आज पासून सुरवात करण्यात आली.सुरवातीला श्री विष्णूंच्या फोटोची पूजा करून ओम नमो भगवते वासुदेवाय चा जप करून पठनाला सुरवात करण्यात आली. अध्यक्षा सौ स्वाती कुळकर्णी व सुमेधा करमरकर ह्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दररोज वेगवेगळया प्रकारचे भगवान विष्णूंना वाण लावण्यात येते.ह्यावेळी सुरभीच्या निलिमा नाईक, सुनीता सातपुते, अश्विनी जोशी,शुभदा राव,चारुलता जोशी,स्मिता बंगाली तसेच श्री सिद्धिविनायक मंडळाच्या लताताई झवर,मंगला अमृतकर,विद्या चौधरी,वत्सालाबाई चौधरी, प्रतिभा चौधरी, कमलताई बोरोले,सुनीता साळुंखे, राजश्री बोरोले,ज्योती तलवारे,मंदाकिनी पाटील,शैलजा नेमाडे,लता सोनवणे,उज्वला कुळकर्णी उपस्थित होत्या. १७ मे ते १५ जुन पर्यंत पठणाचा कार्यक्रम सकाळी 8 वा श्री सिद्धिविनायक मंदिरात सुरु रहाणार आहे.दि.२२ मे शुक्र संध्या साडेसहा वा श्रीराम मंदिरात( जुने जळगांव ) येथे सुद्धा विष्णू सहस्र नाम पठनाचा कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रम सर्वांसाठी असून उपस्थितीचे आवाहन अध्यक्षा सौ स्वाती कुळकर्णी ह्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या