जळगांव – दि.२१(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान येथे संस्थानचे वतीने श्री संत मुक्ताबाईंची ७२८ वी( तिरोभूत) (पुण्यतिथी) वैशाख वद्य दशमी गुरुवार.२२ मे २०२५ या दिनी साजरी करण्यात येत आहे.
पहाटे ५ ते ७ श्री संत मुक्ताईंच्या प्रासादिक पादूकांवर महाभिषेक करण्यात येईल. तसेच मेहरुण शिवारातील श्री शिवाजी उद्यान जवळील श्री सद्गुरू अप्पा महाराजांना आदिशक्ती श्री संत मुक्ताआईंचा शके १७९४ मध्ये दृष्टांत झाला त्या पवित्र स्थळी श्री संत मुक्ताबाई पादुका मंदिर येथे सकाळी 8 ते 9 या वेळात संस्थानचे विद्यमान गादीपती ह.भ.प. श्री. मंगेश महाराज यांचे शुभहस्ते पूजन,अभिषेक होवून वारकरी सांप्रदायीक ह.भ.प.श्रीधर महाराज जळगावकर हरीकीर्तन होईल.
तसेच वैकुंठवासी ह.भ.प. पुष्पाई जोशी यांच्या चतुर्थ मासिक पुण्यतिथी निमित्त जलग्रामदैवत श्रीराम मंदिरात गुरुवार २२ मे गुरुवार संध्याकाळी ६ वा.जळगावातील प्रसिद्ध बालकीर्तनकार ह.भ.प.कु.संस्कृती पवनीकर यांची कीर्तन सेवा होईल हार्मोनियम साथ सौ.स्वरा पाठक तर तबला साथ श्रीधर जोशी करतील. कार्तिकी पाठक, अनुजा कुळकर्णी, भक्ति कुळकर्णी या बाल कलाकार साथ संगत करतील तरी भाविकांनी मेहरूण व जळगाव श्रीराम मंदिरात येऊन कीर्तन श्रवणाचा व श्री संत मुक्ताबाई पादूका दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानाने केले आहे.
श्रीराम मंदिर संस्थान विद्यमाने श्री संत मुक्ताबाई पादूका मंदिर (मेहरुण) येथे उद्या भजन कीर्तनाचा कार्यक्रम..
RELATED ARTICLES
