Friday, September 11, 2026
Homeजळगांव जिल्हाविटनेर येथे शिवजयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

विटनेर येथे शिवजयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

विटनेर – दि.२३(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)“श्री छत्रपती शिवराय बहुउद्देशीय मित्रमंडळ,विटनेर” यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ११ वी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली.सुमारे २० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत लहान गटातून प्रथम – रोहित शंकर पाटील,द्वितीय–अंकिता किरण लव्हाळे,तृतीय – किर्ती समाधान साबळे तर मोठया गटातून.प्रथम–शिवान दिपक नावडे,द्वितीय–वैष्णवी राजपूत,तृतीय–ममता प्रकाश साबळे,उत्तेजनार्थ – प्रतीका प्रमोद सोनवणे
यासर्व स्पर्धकांनी पारितोषिक मिळवले.

कार्यक्रमाचे समर्पक प्रास्ताविक नवल परदेशी यांनी केले.तर सूत्रसंचालन ह.भ.प.संदीप महाराज विटनेरकर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने करून स्पर्धकांचे मनोबल वाढवले.गोपाल गुंजाळ यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी,शरद ठोंबरे,योगेश बाविस्कर,आर्मी नितीन राजपूत,दीपक पाटील,पंकज पाटील व इतर सर्व मंडळ सदस्यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचे परीक्षण,पर्यवेक्षकाची भूमिका विटनेर विद्यालयातील आदर्श शिक्षक बाबूलाल राजपूत सर यांनी चांगल्या प्रकारे बजावली.सरानी स्पर्धकांची वेशभूषा,बोलीभाषा व वेळेचे नियोजन पाहून विजेत्या स्पर्धकांची योग्य निवड करण्यात आली.

गेल्या दहा वर्षांपासून मंडळ हा उपक्रम राबवत असून अनेक विद्यार्थ्यांना यामुळे व्यासपीठ मिळाले आहे. त्यातीलच एक सुमित दिपक खैरे यांची भारत सरकार आयोजित १५ व्या छात्र संसदेत नॅशनल लेव्हल“स्टूडेंट स्पीकर”म्हणून निवड झाली आहे.या अभिमानास्पद यशाबद्दल त्यांच्या वडिलांचा सत्कार करण्यात आला.
तसेच या स्पर्धेतून प्रेरणा घेऊन किर्ती शंकर पाटील हिने कीर्तन क्षेत्रात प्रगती करत आज समाज प्रबोधनाच कार्य सुरू केले आहे. त्याबद्दल तिच्या वडिलांचाही सत्कार करण्यात आला.

यापुढे हा उपक्रम अधिक मोठ्या स्वरूपात राबवण्याचा मानस असून पंचक्रोशीतील गावांना सहभागी करून “शिवसप्ताह”आयोजित करण्याचा मंडळाचा संकल्प आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या