जळगांव – दि.१८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) सामाजिक समता,श्रमिकांच्या हक्कांचा बुलंद आवाज, अन्यायाविरुद्ध संघर्षाची प्रेरणा आणि आपल्या साहित्य, शाहिरी व लोककलेतून समाजप्रबोधन करणारे थोर साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे-राजूमामा,भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी,जळगाव शहराच्या महापौर सौ.दिपमाला काळे,उपमहापौर मनोज चौधरी,स्थायी समिती सभापती डॉ.चंद्रशेखर पाटील,भाजपा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी,नितीन इंगळे,महानगर उपाध्यक्ष राजेंद्र मराठे,दिपक परदेशी,कोषाध्यक्ष विजय वानखेडे,कार्यालय मंत्री प्रकाश पंडित,सोशल मीडिया संयोजक मयूर भदाणे,मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, नगरसेविका वैशाली पाटील,अनिल अडकमोल,महेश चौधरी,संजय नारखेडे,संजय विसपुते,प्रमोद वाणी, दिलीप लाडवंजारी,तुषार सूर्यवंशी,किसन मराठे,राहुल सनकत,शुभम विंचवेकर,संदीप ढंढोरे,शिवा कळस्कर, हर्षल सोनवणे,तसेच भारतीय जनता पार्टी जळगाव महानगरचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा जळगाव महानगर तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..▫️
RELATED ARTICLES
