पुणे – दि.१२.पुणे येथील दि.प्रीमिअर को ऑप.प्रिंटर्स लिमिटेड या सहकार क्षेत्रातील नामवंत मुद्रणालयाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी निवडणूक दि.१२ रोजी पार पडली.या वेळी अंकुश खंडेराव काकडे पुणे यांची अध्यक्ष म्हणुन व विजय(बापु) रामदास पाटील जळगाव यांची उपाध्यक्ष म्हणुन एकमताने निवड करण्यात आली.
या प्रसंगी अध्यासी अधिकारी म्हणुन सौ.प्रगती वाबळे सहाय्यक निबंधक सह.संस्था(२)पुणे यांनी कामकाज पाहिले.यावेळी नवनियुक्त संचालक श्री.रमेश हिंगणकर (अकोला),प्रताप पाटील(सांगली),शिवाजी राठोड( यवतमाळ),विनोद मर्गज(कणकवली),अविनाश अरिंगळे (नाशिक),सिद्धांत दराडे(नाशिक),राजेंद्र तायडे( लासगाव),सौ.सिंधुताई गोळे(पुणे),श्रीमती वृषाली चव्हाण(वाई)हे उपस्थित होते.याप्रसंगी जितेंद्र कोठारी ,चंद्रशेखर सातपुते,जी.पी मोर,सहकार खात्याचे लादे, डापसे,प्रकाश भोईटे,सौ.बिडवे इत्यादी उपस्थित होते.
पुणे येथील दि. प्रीमिअर को ऑप. प्रिंटर्स लिमिटेड अंकुश काकडे अध्यक्षपदी तर विजय बापू पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड..
RELATED ARTICLES
