Thursday, October 29, 2026
Homeजामनेर परिसर...दिपक अशोक पाटील यांची भाजपा केमिस्ट आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी निवड.

दिपक अशोक पाटील यांची भाजपा केमिस्ट आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी निवड.

जळगाव  – दि.१० (धर्मसाथी मिडिया नेटवर्क)
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) केमिस्ट आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी जामनेर येथील दिपक अशोक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप जळगाव जिल्हा (पूर्व)चे जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रकांत बाविस्कर यांनी दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्तीची घोषणा केली.मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष,आ.रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने तसेच जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच केंद्रीय राज्यमंत्री ना.रक्षा खडसे,वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,जिल्हा प्रभारी आ.अनुप अग्रवाल, खा.स्मिता वाघ,आ.सुरेश भोळे (राजूमामा), आ.मंगेश चव्हाण,आ.अमोल जावळे आणि आ.नंदकिशोर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.

त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील केमिस्ट व औषध विक्रेत्यांच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे.पक्ष संघटन मजबूत करणे आणि औषध विक्रेते व केमिस्ट बांधवांच्या विविध समस्या वरिष्ठ पातळीवर मांडून त्या सोडवण्या साठी योगदान दिले आहे.त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन पक्षाच्या वरिष्ठ ध्येय-धोरणानुसार आणि पदाधिकाऱ्यांच्या संमतीने ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.त्यांच्या या नियुक्तीबद्दल भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी, नगरसेवक,केमिस्ट असोसिएशनचे सदस्य, लोकप्रतिनिधी आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आपल्या निवडीबद्दल आभार मानताना दिपक पाटील यांनी सांगितले की ना.गिरीश महाजन यांनी माझ्यावर विश्वास दाखवत सलग दुसऱ्यांदा मला पक्षाचं काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी ना.गिरीश भाऊंचे मनापासून आभार मानतो,व भाऊंनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत जळगाव पूर्व जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि संघटन अधिक मजबूत करून पक्ष अजून भक्कम करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.

तसेच यामध्ये जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत बाविस्कर तसेच आमचे केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांचा सिंहाचा वाटा आहे कारण त्यानी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनातून व सहकार्यातूनच मी काम करत राहिलो आणि इथपर्यंत पोहचू शकलो.त्याच बरोबर पक्षातील सर्व वरिष्ठ नेते,पदाधिकारी, संपूर्ण जळगाव जिल्हा केमिस्ट टीम व कार्यकर्त्यांचे देखील आभार मानले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या