Thursday, October 29, 2026
Homeकेमिस्ट विश्व..जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असो.ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न...सुनील भंगाळे यांची...

जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असो.ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न…सुनील भंगाळे यांची सलग आठव्यांदा बिनविरोध जिल्हाध्यक्षपदी निवड..नूतन कार्यकारिणी घोषित..स्वीकारला पदभार…१००० केमिस्ट बांधवांची सभेला उपस्थिती.

जळगाव – दि.२७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) केमिस्ट सह सामाजिक सेवा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशनची वार्षिक सर्व साधारण सभा रविवारी सकाळी ११ वाजता केमिस्ट भवन जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.जिल्हाभरातील विविध तालुक्यांमधून केमिस्ट पदाधिकारी,सदस्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन २०२६ ते २९ ची नूतन कार्यकारीणी या सभेत घोषित करण्यात आली.सभेच्या प्रथम सत्राची सुरुवात सकाळी ११ वाजता झाली.दिवंगत सभासद तसेच त्यांच्या दिवंगत नातलगांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.त्यानंतर सन २०२६ ते २९ या कालावधी साठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणारे भानुदास नाईक, सुरेंद्र बोहरा आणि अशोक जैन यांना सभेच्या व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले.या प्रसंगी जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यानंतर नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला.निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यासपीठावर सन २०२६ ते २९ साठी नूतन कार्यकारिणीची घोषणा केली.नियुक्ती होत असलेल्या जिल्हा संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचे पदा नुसार नाव जाहीर करून त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले.

सर्वाधिक वेळा अध्यक्षपद भूषविणारे विक्रमवीर जिल्हाध्यक्ष केमिस्टभूषण सुनील भंगाळे..आपल्या कर्तुत्वाने व झुंजार नेतृत्व गुणाचे धनी डायनॅमिक अध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे सुनील भंगाळे यांची सलग आठव्यांदा बिनविरोध निवड झाली. या सभेत केमिस्ट बांधवांनी आनंदाने टाळ्यांचा कडकडाट केला.उत्स्फूर्त घोषणा दिल्या.केमिस्ट भूषण सुनील रामदास भंगाळे यांची केमिस्ट सदस्यांच्या आग्रही एकमताने निवडणूक अधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष पदी सलग आठव्यांदा बिनविरोध निवड झाल्याने या प्रसंगी सभागृहात उपस्थित सभासदांनी त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाचा सन्मान करीत उभे राहून त्यांना मानवंदना दिली.त्यांच्या नेतृत्वाखाली व प्रभावी कार्यशैली मुळे संघटनेच्या कार्याला सातत्याने बळ मिळत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

घोषित नवीन कार्यकारिणी — संन २०२६ ते २०२९

सुनील रामदास भंगाळे-अध्यक्ष,समीर सुभाष गुळवे-कार्याध्यक्ष(उपाध्यक्ष),संदीप ताराचंद बेदमुथा-उपाध्यक्ष, मनिषकुमार भाईदास पाटील-उपाध्यक्ष,अनिल राजमल झंवर-मानद सचिव,श्रीकांत वसंत पाटील – सहसचिव, खलीद रहमतुल्ला सय्यद-सहसचिव,पंकज चक्रधर पाटील-सहसचिव,दिनेश रामनारायण मालू-कोषाध्यक्ष, संजय रामप्रसाद तिवारी-संघटन सचिव,योगेश नीलकंठ भोकरें-सह संघटन सचिव,अमित सुभाष चांदीवाल-पी.आर.ओ,हर्षल जैन -ग्रामीण पी.आर.ओ,नरेश भगवानदास मंधान-कार्यकारिणी सदस्य,निलेश चंद्रकुमार चौधरी-कार्यकारिणी सदस्य,निखिल संजय वाणी कार्य कारिणी सदस्य/युथ विंग,मयुर मनोज पाटील-कार्य कारिणी सदस्य/युथ विंग,सौ.अश्विनी शिवाजी पाटील-कार्यकारिणी सदस्य/वूमन केमिस्ट विंगतरुण नेतृत्वाला संधी आणि महिला नेतृत्वाला स्वतंत्र व्यासपीठ..

विशेष म्हणजे तरुण नेतृत्वाला संधी आणि महिला नेतृत्वाला स्वतंत्र व्यासपीठ देत संघटनेला अधिक व्यापक व गतिमान करण्याचा परिवर्तन घडवणारा नवा अध्याय जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या कुशल नेतृत्वा खाली व मानद सचिव अनिल झंवर यांच्या मार्गदर्शना खाली सुरू करण्यात आला आहे.जिल्हा युथ विंगची जबाबदारी निखिल वाणी यांच्याकडे,तर वूमन युथ विंग ची जबाबदारी सौ.अश्विनी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली.

दुसऱ्या सत्रात नूतन कार्यकारिणीने स्वीकारला पदभार

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दुसऱ्या सत्रात नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारल्यानंतर सन २०२६ ते २९ या कार्यकाळातील पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली.यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून उपस्थित झालेल्या नवनियुक्त कार्यकारिणींचे स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला.तालुकास्तरावर संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

शैक्षणिक उपक्रमांवर विशेष भर देण्याचे आवाहन
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन करताना सांगितले की,सर्व तालुक्यांतील नवनियुक्त कार्यकारिणींनी संघटनेच्या कामाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देऊन संघटनेला अपेक्षित असलेले विविधांगी कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत.विशेषतःकेमिस्ट एज्युकेशन प्रोग्राम,रेग्युलेटरी अपडेट्स व्यवसायविषयक मार्गदर्शन आणि केमिस्ट बांधवांच्या ज्ञानवृद्धीसाठी शैक्षणिक उपक्रम यावर विशेष भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

ट्रेड अँड इंडस्ट्री मधील अडचणी सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील..

ट्रेड अँड इंडस्ट्री संदर्भात मार्गदर्शन करताना सुनिल भंगाळे यांनी सांगितले की,केमिस्ट बांधवांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी राज्य संघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा योग्य पद्धतीने विनियोग करावा.तालुका व जिल्हास्तरावरील समस्या संघटनेच्या माध्यमातून योग्य त्या पातळीवर मांडून त्यावर सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.“सदस्यांची अडचण समजून घेणे, योग्य पातळीवर मांडणे आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे,ही संघटनेची जबाबदारी आहे,”असा संदेश त्यांनी दिला.

सामाजिक विकासाच्या संकल्पनेला चालना..

यावेळी मा.केमिस्टहृदय सम्राट आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे यांच्या सामाजिक विकासाच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी तसेच या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत आणण्या साठी प्रयत्न करणाऱ्या जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या सामाजिक विकासाच्या ध्येयाला पुढे नेण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन करण्यात आले.केमिस्ट संघटना ही केवळ व्यवसायाशी संबंधित प्रश्न सोडविणारी संघटना न राहता शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेणारी सक्षम संघटना म्हणून पुढे यावी,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

 एकजुटीने संघटनेच्या विकासाचा संकल्प..

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याशी अधिक प्रभावी संपर्क, सदस्यांच्या अडचणींचे निराकरण,केमिस्ट एज्युकेशन प्रोग्राम,तरुण व महिला नेतृत्वाला संधी तसेच सामाजिक उपक्रमांना चालना देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.या पुढील काळात देखील “एकजूट केमिस्ट,सक्षम संघटना,प्रगत व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी”या विचाराने जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशनची पुढील वाटचाल करण्याचा निर्धार सभेत व्यक्त करण्यात आला.जिल्हा केमिस्ट संघटनेची सभा यशस्वी करण्या साठी मा.निवडणूक अधिकारी जळगाव जिल्हा व तालुका पदाधिकारी,सदस्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या