Friday, June 5, 2026
Homeजळगांव शहर“जर्मनी फूड फेस्टिव्हलमध्ये खान्देशी चवीचा जलवा..जळगावच्या युवतीचा ‘कढी-फुणके’ स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू”..

“जर्मनी फूड फेस्टिव्हलमध्ये खान्देशी चवीचा जलवा..जळगावच्या युवतीचा ‘कढी-फुणके’ स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू”..

वूल्फसबर्ग – दि.१८ (धर्मसाथी मिडिया नेटवर्क) जर्मनीतील वूल्फसबर्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या फूड फेस्टिव्हलमध्ये जळगावच्या सोनल जोशी या युवतीने खांदेशी विशेष‘कढी-फुणके’चा स्टॉल लावून सर्वांचे लक्ष वेधले.विशेष म्हणजे, जळगावमधून सहभागी झालेली ती एकमेव प्रतिनिधी होती.परदेशी नागरिकांनी खांदेशी पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्टॉलवरील मराठमोळ्या चवीमुळे आणि सादरीकरणामुळे अनेकांनी कौतुक केले. जर्मनीमध्ये खांदेशी संस्कृती आणि खाद्यपरंपरेची ओळख करून देण्याची संधी मिळाल्याने अभिमान वाटत असल्याची भावना तिने व्यक्त केली.“जर्मनीमध्ये‘कढी-फुणके’सारखा खांदेशी पदार्थ लोकांना आवडला,हा माझ्यासाठी खूप खास अनुभव होता.”अशी प्रतिक्रिया तिने धर्मसाथी लाईव्ह न्यूजशी बोलताना व्यक्त केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या