करनाळा – दि.०१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)कान्हदेश जळगाव येथून श्री सद्गुरू आप्पा महाराजांनी शके 1794 मध्ये प्रारंभ केलेली आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे ३० जुन दिनी दुपारी ११ वाजता मार्केट यार्ड नगर नाक्यावर संजय एकाळ परिवाराने पुष्पहार घालून स्वागत केले.
पालखी श्री मारुती मंदिर,सावंत गल्ली,दत्त पेठ,भवानी नका,फंड गल्ली,श्री स्वामी समर्थ मंदिर मार्गे सुतार गल्लीत शुभागमन झाले.पालखी मार्गात ठिकठिकाणी सडा रांगोळी काढण्यात आल्या भाविकांनी दर्शन घेतले.सुतार गल्लीत परदेशी परिवाराने फटाके फोडून स्वागत केले.एकाळ परिवाराच्या घरत आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई प्रासादिक चैतन्य पादुकांचे पूजा अभिषेक आरती झाली,दुपारी परदेशी परिवारा तर्फे समस्त वारकरी मंडळींना चहापाणी तर संजय एकाळ परिवारा तर्फे समस्त वारकरी मंडळीना भोजन व्यवस्था केली, संध्याकाळी हरिपाठ झाला समस्त चुंग परिवारा तर्फे चहापान होऊन संध्याकाळी ७ वाजता येकाळ वाड्यात ह.भ.प.श्री अभिषेक महाराज उगले(अहिल्यानगर) यांचे हरिकीर्तन झाले.
रात्री क्षीरसागर परिवारातर्फे श्री स्वामी समर्थ मंदिरात भोजन प्रसाद देण्यात आला.करमाळ्यातील असंख्य भाविकांनी आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई पालखी दर्शनाचा लाभ घेतला.पालखी प्रमुख ह.भ.प.श्री मंगेश महाराज यांनी समस्त भाविकांना प्रसाद दिला दि.१ जुलै दिनी पहाटे ४ वाजता पालखीचे जेऊर कडे प्रस्थान झाली.
करमाळ्यात श्री संत मुक्ताबाई पालखीचे स्वागत
RELATED ARTICLES
