Friday, September 11, 2026
Homeजळगांव जिल्हाआसोदा सार्वजनिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी जयंती उत्साहात..कविता सादर..

आसोदा सार्वजनिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी जयंती उत्साहात..कविता सादर..

आसोदा,- दि.२४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क ) खानदेश कन्या व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्त आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांसमोर लेवा गणबोली भाषेतून बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवर कवियत्री शीतल पाटील यांनी मनोगत व्यक्त करत बहिणाबाईंच्या साहित्याचा आणि त्यांच्या कवितांमधील जीवनदृष्टीचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला.कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल, वानखेडे सर यांच्यासह शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. तसेच शाळेचे अध्यक्ष अनिल महाजन, ‘दिव्य मराठी’चे संपादक प्रदीप राजपूत आणि वाणी सर यांचीही उपस्थिती लाभली.कार्यक्रमादरम्यान बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करून त्यांच्या कवितांमधील ग्रामीण जीवन, संस्कार आणि सामाजिक जाणिवांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या