सोलापूर – दि.२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) सोलापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष केमिस्ट भूषण सुनील भंगाळे यांचा राज्य केमिस्ट संघटना निवडणुकीत उपाध्यक्ष पदी विजयी झाल्याबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सुनील भंगाळे यांनी सोलापूर मेडिकल असोसिएशनच्या बैठकीत उपस्थित केमिस्ट बांधवांना अनेक समस्या अडी अडचणी सोडवण्यासाठी संघटनेच्या नवीन धोरणांवर वाटचाल करण्या संदर्भात मार्गदर्शन केले.तसेच संघटनेने केलेल्या सन्मानासाठी आभार मानले.
जळगावच्या संघटनात्मक नेतृत्वाचा राज्यस्तरावर होत असलेला सन्मान आणि संवादाचा हा एक अभिमानास्पद क्षण असल्याने जळगाव जिल्हा कार्य कारीणीने देखील या सन्मानाचे स्वागात केले आहे.