Monday, November 2, 2026
Homeजळगांव शहरमहेंद्र ट्रेडिंग प्रांगणात दिवाळी फराळ विक्री केंद्राचा शुभारंभ..'निल-हरी श्रीजी ब्रँड'च्या दर्जेदार फराळाला...

महेंद्र ट्रेडिंग प्रांगणात दिवाळी फराळ विक्री केंद्राचा शुभारंभ..’निल-हरी श्रीजी ब्रँड’च्या दर्जेदार फराळाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

जळगाव – दि.२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क ) दिवाळी सणाच्या मंगलमयी पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील विसनजी नगर परिसरा तील अग्रगण्य किराणा व धान्य विक्री प्रतिष्ठान ‘महेंद्र ट्रेडिंग कंपनी’ च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य ‘दिवाळी फराळ विक्री केंद्र’ स्टॉल स्वरूपात सुरू करण्यात आले आहे. १ नोव्हेंबर रोजी या केंद्राचा दिमाखात शुभारंभ झाला असून, ग्राहकांचे अत्यंत विश्वास पात्र ठरलेल्या ‘निल-हरी श्रीजी ब्रँड’ चे विविध प्रकारचे चविष्ट व दर्जेदार फराळ पदार्थ येथे रास्त दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

एकाच छताखाली चव आणि दर्जाची हमी

दिवाळीच्या धावपळीत ग्राहकांना शुद्ध, चविष्ट आणि घरगुती चवीचे दर्जेदार फराळ पदार्थ एकाच ठिकाणी खरेदी करता यावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या विक्री केंद्रात खास दिवाळीसाठी तयार करण्यात आलेली चवदार रतलामी शेव, गुजराती भावनगरी गाठी व शेव, विशेष लसूण चिवडा, खट्टा-मीठा फरसाण,पारंपरिक पद्धतीचे अनारसे, खुसखुशीत शंकरपाळी , चकली, तोंडात विरघळणारे बेसन लाडू, दालमुठ, मूग डाळ यांसह गृहिणींच्या पसंतीस पडणारे विविध फराळ पदार्थ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.

ग्राहकांच्या आरोग्याला आणि समाधानाला प्राधान्य: संचालक प्रदीप वेद

या उपक्रमाविषयी माहिती देताना महेंद्र ट्रेडिंग कंपनीचे संचालक श्री. प्रदीप वेद यांनी सांगितले की, “आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिवाळी निमित्त हा खास उपक्रम ग्राहकांसाठी राबविण्यात येतो. ग्राहकांना शुद्धता, सर्वोत्तम गुणवत्ता आणि १००% विश्वासा र्हतेची खात्री असलेली उत्पादने उपलब्ध करून देणे, तसेच सणा सुदीच्या काळात त्यांच्या आरोग्या ची पूर्ण काळजी घेऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करणे, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.”

मध्यवर्ती जागेमुळे जळगावकरांची मोठी सोय

विसनजी नगर या मध्यवर्ती आणि सोयीच्या ठिकाणी हे विक्री केंद्र सुरू झाल्यामुळे शहर आणि परिसर परिसरा तील ग्राहकांची मोठी सोय झाली आहे. फराळाची शुद्धता आणि रास्त दर यांमुळे खरेदीसाठी या केंद्रावर ग्राहकांची गर्दी सातत्याने वाढत असून, ‘निल-हरी श्रीजी ब्रँड’ च्या उत्पादनांना जळगावकरां कडून पसंतीची पावती मिळत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या