जळगाव – दि. २५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) : अनंत चतुर्दशी निमित्त श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगर जळगावच्या वतीने हार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार व स्वागत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी मनपासमोर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात आमदार एकनाथराव खडसे यांच्या हस्ते गणेश मंडळांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. प्रमुख अतिथी म्हणून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. बी. एस. महाजन, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, प्रदेश सरचिटणीस ॲड. रविंद्रभैय्या पाटील, प्रदेश सरचिटणीस इजाज मलिक, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील तसेच जिल्हा निरीक्षक भास्कर काळे उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत कार्यक्रम
अमर रगडा शेजारी, नाथ प्लाझा शेजारी, जळगाव येथे दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगरचे जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, जिल्हाकार्याध्यक्ष डॉ.संग्रामसिंग सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष राजु मोरे,राष्ट्रवादी काँग्रेस युवक महानगरचे जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी आणि महिला आघाडी महानगरच्या जिल्हाध्यक्ष सौ. मंगला पाटील यांनी आवाहन केले आहे.
