Wednesday, November 4, 2026
Homeजळगांव शहरलोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५१ वी जयंती साधेपणाने साजरी.. दुष्काळी परिस्थितीच्या...

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५१ वी जयंती साधेपणाने साजरी.. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोटारसायकल रॅली रद्द; सकल लेवा समाजातर्फे पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन..

जळगाव – दि. १ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) — अखंड भारताचे शिल्पकार, भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनातील त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व पूजन करून सकल लेवा समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोटारसायकल रॅलीसह मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, यंदा जळगाव परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच संकटात सापडलेल्या शेतकरी बंधू-भगिनींच्या पाठीशी संवेदन शीलतेने उभे राहण्याच्या भावनेतून जयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयातून समाजाने शेतकऱ्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.

याप्रसंगी प.पू. नयन स्वामी, प.पू. दिव्यप्रकाश स्वामी, डॉ. ए. जी.भंगाळे, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमालाताई काळे, उपमहापौर मनोज चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख, भोरगाव लेवा पंचायत विभागप्रमुख विष्णू भंगाळे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कैलासअप्पा सोनवणे, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. प्रशांत वारके, नगरसेवक प्रदीप रोटे, डॉ. विरेंद्र खडके, सुनील खडके, प्रकाश बालाणी, मनोज काळे, नरेंद्र पाटील, सागर सोनवणे, हर्षल मावळे, नगरसेविका उज्वलाताई बेंडाळे, गायत्रीताई राणे, नीलाताई चौधरी, वैशालीताई झोपे, जगन्नाथ किनगे, किरण बेंडाळे, सुरेश अत्तरदे, प्रकाश वराडे, मधुकर भंगाळे, ॲड. पंढरीनाथ चौधरी, महेंद्र पाटील, राजेश वारके, अतुल भगत, भूषण चौधरी, डॉ. राहुल चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विलास बरडे, बिपिन झोपे, वंदन वाणी, अमोल कोल्हे, एकनाथ पाचपांडे, धनंजय फिरके, हरीश कोल्हे, प्रा. अतुल इंगळे, प्रा. योगेश महाजन, प्रा. डॉ. निलेश पाटील, महेश चौधरी, छोटू खडके, रवींद्र रडे, निखिल रडे, अमोल बढे, बंटी भारंबे, अमोल मोरे, शंतनू नारखेडे, राजेंद्र बढे, शैलेश काळे, हेमंत पाटील, यतीन रोटे, देवेंद्र सूर्यवंशी, प्रवीण पाटील, शुभम निकम, सचिन पाटील, युवराज चौधरी, सनी कोल्हे, स्वप्निल रडे, दीपक चौधरी, मनीष चौधरी, संदीप चौधरी, जितेंद्र कोतवाल, गोवर्धन पाटील, राहुल चौधरी सर, सुनील वि. खडके, दीपक अत्तरदे, गणेश वाणी, कुंदन पाटील, प्रवीण गुरव, नरेंद्र बोरसे, प्रफुल्ल सरोदे, सचिन महाजन, विजय नारखेडे तसेच सकल लेवा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या