जळगांव – दि.१३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
ब्राह्मण सभा महिला समितीतर्फे दि.१२ सप्टेंबर शनिवार रोजी हरतालिका आवरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
हरतलिके निमित्त “भक्तिगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.एकूण २० स्पर्धाकांनी ह्यात आपले सादरीकरण केले.तसंच उपस्थित समाज भगिनींसाठी “सखी रूपवती “स्पर्धेचे आयोजन केलं होते.ह्यातही महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
भक्तिगीत स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे भाग्यश्री राव प्रथम क्र.नेहा नितीन रस्से,द्वितीय क्र.मानसी विपीन कुलकर्णी,तृतीय मनिषा मंगेश पापरीकर, उत्तेजनार्थ प्रथम रसिका मुकुंद ढेपे-उत्तेजनार्थ द्वितीय तसंच सखी रूपवती स्पर्धेत विजयी ह्या प्रमाणे मंजुषा अडावदकर प्रथम,रुचिता सौरभ नाईक-द्वितीय दोन्ही स्पर्धेचे परीक्षण संपदा छापेकर तुंबडे आणि प्रा.इशा वाडोदकर ह्यांनी केले.प्रास्ताविक वैदेही नाखरे तर सूत्रसंचालन -मीना जोशी आणि श्रद्धा शुक्ल,आभार प्रदर्शन श्रद्धा कुलकर्णी यांनी केले.
स्वप्नगंधा जोशी,रेवती कुरुंभट्टी,वृषाली व्यवहारे ह्यांनी कार्यक्रम यश्वितेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमानंतर महिलांनी अल्पपोपहार आणि चहापानाचा आस्वाद घेतला.
ब्राह्मण सभा महिला समितीतर्फे हरतालिका आवरणाचा कार्यक्रम संपन्न
RELATED ARTICLES
