Monday, September 14, 2026
Homeजळगांव शहरनवी पेठेत अवतरणार जगन्नाथ पुरी भव्य आरास... श्री आगमना निमित्त शहरातून भव्य...

नवी पेठेत अवतरणार जगन्नाथ पुरी भव्य आरास… श्री आगमना निमित्त शहरातून भव्य श्री जगन्नाथ रथयात्रा आयोजन..

जळगांव – दि.१३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी पेठ गणेश मंडळातर्फे यंदाच्या वर्षी जगन्नाथ पुरीची भव्य आरास साकारली जात आहे .मंडळाचे गणेश उत्सवाचे हे ५३ वे वर्ष असून यापूर्वी देखील धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक, विषयांवर केलेल्या प्रबोधनात्मक आरास वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत.नवी पेठ गणेश मंडळाला विविध पारितोषिक देवून विविध संस्था तसेच प्रशासनाकडून ‘जळगाव जिल्ह्याचे भूषण ‘ या उपाधीने गौरवण्यात आले आहे.मंडळातील अनेक जेष्ठ ,कनिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते मंडळींच्या अनमोल मार्गदर्शनातून योगदानातुन अखंड वाटचालीने कर्तुत्वाची उत्तुंग भरारी घेतली आहे.प्रतिवर्षी श्री गणेश उत्सव ,दही हंडी उत्सव, दत्त जयंती उत्सव मोठ्या उस्ताहात साजरा केला जातो.

अव्यवसायिक ढोल ताशा पथक..

नवी पेठ गणेश मंडळ संचलित नाव लौकीक प्राप्त युवा गर्जना अव्यावसायिक ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून गेल्या १२ वर्षापासून विविध वाद्यांनी सुसज्ज अश्या दर्जेदार ढोल ताशा वादन पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.यात युवा युवतींचा सक्रीय सहभाग मोठ्या संख्येने असून सादरीकरणातील ताल ठेक्याने प्रत्येकाचे चित्त वेधले जाईल असे जोरदार सादरीकरण या पथकाच्या माध्यमातून श्री गणेश उत्सव आगमन व निरोप सोहळा,दही हंडी उत्सवात केले जाते.तसेच श्री गणेश उत्सव अगोदर एक महिन्या पासून सराव प्रारंभ होवून नवीन सदस्यांना प्रशिक्षित केले जाते .या पथकाला मंडळाचे पदाधिकारी मधुर झंवर, वादन प्रमुख कृष्णा सोनवणे,अक्षय जोशी,आकाश वाघ,कु.दिपाली चौधरी, कु.हेमांगी बोरोले, कु. हर्षिता सोनवणे यांचे माध्यमातून संचलित केले जाते.

नवी पेठेत अवतरणार श्री जगन्नाथ पुरीची भव्य आरास…

भगवान श्री जगन्नाथा च्या कृपेने व इस्कॉनच्या, अमूल्य सहकार्याने यावर्षी गणेशोत्सवात नवी पेठ गणेश मंडळाचे वतीने यंदाच्या वर्षी भगवानश्री जगन्नाथ मंदिर (जगन्नाथ पुरी), व इस्कॉन संबंधित भव्य आरास सादर केली जात आहे. तसेच आरास देखाव्याला भेट देणाऱ्या सर्व गणेश भक्तांना संध्याकाळ च्या महाआरती नंतर रोज प्रसाद वितरण केला जाणार आहे.रोज भगवान श्री जगन्नाथ यांची विशेष पूजा अर्चना शास्त्रोक्त वेदमंत्रांनी येथे केली जाणार असून दिवस भरातून एकूण ५ वेळा नैवद्य अर्पण केला जाणार आहे.तसेच भगवान श्री जगन्नाथ यांना ५६ भोग नैवद्य अर्पण कार्यक्रम देखील केला जाणार आहे. विशेष म्हणजे श्री गणरायाच्या स्थापनेच्या दिवशी दि.१४ सप्टेंबर रोजी भव्य शोभा यात्रेचे आयोजन उस्ताह पूर्ण वातावरणात करण्यात आले आहे.श्री गणराय व भगवान श्री जगन्नाथ,सुभद्रा, बलभद्र व सुदर्शन मूर्ती आणि विग्रह रथावर विराजमान होतील. सदर भव्य रथ व रथयात्रेसाठी देखील इस्कॉन व भक्त परिवाराचे मौलिक सहकार्य मंडळास लाभले आहे.श्री जगन्नाथ भक्त इस्कॉन भक्त परिवार घनश्याम रुंगठा (बंटी भाऊ) ह्यांच्या मार्गदर्शना खाली श्री जगन्नाथ सेवा केली जाणार आहे.

           शहरातून भव्य शोभा यात्रा..

श्रीगणेश स्थापनेच्या दिवशी शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा प्रारंभ भारत दुग्धालय नवी पेठ येथून होणार असून ही मिरवणूक नवी पेठ गणेश मंडळ चौक, मद्रास बेकरी चौक, टॉवर चौक, चित्रा चौक इच्शापूर्ती गणेश मंदिर, बँक स्ट्रीट नवी पेठ मार्गे नवी पेठेत गणेश मंडळा जवळ माघारी अश्या मार्गाने मार्गक्रमण करेल.
१४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ठीक २.२० वा. सर्वांनी सदर शोभा यात्रा (रथ यात्रा) मिरवणुकीत अवश्य सहभागी उपस्थित राहून मिरवणुकीची व उत्सवाची शोभा द्विगुणित करावी असे आवाहन नवी पेठ गणेश मंडळाचे प्रेरणास्थान प्रमोद अग्रवाल अध्यक्ष मनीष झंवर, उपाध्यक्ष : शैलेश काबरा ,सचिव: सुनील जोशी (गोटू जोशी) , कोषाध्यक्ष :विनोद मुंदडा,संदीप जोशी कैलास मुंदडा, लोकेश राठी ,अमोल जोशी, रोहित सुलक्षणे , अतुल वाणी, अक्षय जोशी,अभिषेक झवर, विष्णू मुंदडा,हेमंत रूंगठा,भूषण मुंदडा,यांनी केले आहे.अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख प्रसाद जोशी यांच्या वतीने कळवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या