Tuesday, November 3, 2026
Homeउद्घाटन सोहळा..जळगावमध्ये 'मित्सुबिशी हेवी ड्युटी'अधिकृत ब्रँड शॉपचे भव्य उद्घाटन... श्री नाथजी एजन्सीजच्या अत्याधुनिक...

जळगावमध्ये ‘मित्सुबिशी हेवी ड्युटी’अधिकृत ब्रँड शॉपचे भव्य उद्घाटन… श्री नाथजी एजन्सीजच्या अत्याधुनिक आणि भव्य दालनाचा अधिकृत उद्घाटन सोहळा संपन्न..

जळगाव :- दि.३१(धर्मसाथी मिडिया नेटवर्क) जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या MHI-IAPL (एम.एच.आय-आय ए पी.एल) ग्रुपतर्फे जळगाव शहरात ग्राहकां च्या सेवेसाठी ‘मित्सुबिशी हेवी ड्युटी एक्स्क्लुझिव्ह ब्रँड शॉप’ सुरू करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रेल्वे स्टेशन रोड सारख्या मध्यवर्ती परिसरात या अत्याधुनिक आणि भव्य दालनाचा अधिकृत उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

          मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या दिमाखदार सोहळ्याला MHI-IAPL ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी रविकुमार आचार्य,सूरज सोणारे, मुश्ताक कुरेशी आणि सुनील वैश्य प्रामुख्याने उपस्थित होते.या प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंत डीलर्स, नामांकित व्यावसायिक ,आर्किटेक्ट्स (वास्तुविशारद) ,मौल्यवान ग्राहक आणि कंपनीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व उपस्थितांच्या साक्षीने या ब्रँड स्टोअरचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.

           मार्गदर्शन आणि आशीर्वाद

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करण्या साठी कंपनीचे माननीय चेअरमन जीवन सिंग चौहान आणि मॅनेजिंग डायरेक्टर (MD) अमन चौहान यांचे अमूल्य मार्गदर्शन, पाठबळ आणि आशीर्वाद लाभले.त्यांच्या दूरदृष्टीमुळेच जळगाव करांना जागतिक दर्जाचे एअरकंडिशनिंग तंत्रज्ञान आता स्थानिक पातळीवर थेट अनुभवता येणार आहे.

  भव्य यश आणि समृद्धीसाठी शुभेच्छा..

मित्सुबिशी हेवी ड्युटी एअर कंडिशनर्सची उत्पादने त्यांच्या उच्च दर्जा, टिकाऊपणा आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखली जातात.या नवीन दालनामुळे जळगावच्य बाजार पेठेत कंपनीच्या व्यवसायाला एक नवी उंची लाभेल,असा विश्वास व्यवस्थापनाने व संचालक कल्पेश वेद यांनी व्यक्त केला आहे.या भव्य शुभारंभाच्या निमित्ताने जळगावातील संपूर्ण टीम आणि भागीदारांचे कंपनीतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीस भरघोस यश व समृद्धीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या