Sunday, April 19, 2026
HomeUncategorizedकालिंका माता मंदिराजवळ डंपरच्या धडकेत मजुर ठार ..अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पावले...

कालिंका माता मंदिराजवळ डंपरच्या धडकेत मजुर ठार ..अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावी..

जळगाव – दि.१३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) कालीका माता मंदिराजवळ कामावरून घरी परतणाऱ्या मजुरास डंपरने चिरडल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. यात जुने जळगाव तेली चौकातील प्रभाकर रघुनाथ पाटील(अहिरे)वय वर्ष ५६ हे जागीच ठार झाले. असून ही घटना रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.कुटुंबीयांना याबाबत माहिती कळताच त्यांनी एकच आक्रोश केला.या परिसरात सातत्याने अपघात होत असतात.अश्या प्रकारच्या अपघाती घटनेची ही तिसरी वेळ असून,या ठिकाणी सिग्नल असताना देखील ही यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यान्वित नसल्याने तसेच वाहतूक शाखेचा कर्मचारी तेथे तैनात नसल्याने ही सिग्नल यंत्रणा निरुपयोगी ठरत आहे.या परिसरात पोलीस प्रशासनावर नाराजीचा सूर उमटत आहे.हा अपघाती स्पॉट आणखी किती बळी घेईल?अशी भितीसह येथे सुरक्षितता कधी निर्माण होईल याची अपेक्षा परिसरात व्यक्त होत आहे.स्थानिक नगरसेवकांनी देखील पोलिस प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या