जळगांव – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पटेल नगर येथे माननीय आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षरोपण कार्यक्रमात जळगावचे हरित भविष्य घडवण्यासाठी एक रोप तुमच्या हाताने देखील लावण्यासाठी अवश्य या अशी हाक पर्यावरण प्रेमींना घालण्यात आली होती.निसर्गाच्या रक्षणासाठी अमूल्य वेळ आम्हास द्या असे आवाहन करीत संवर्धन करण्याचे कामाची जबाबदारी ग्रीन सिटी फाउंडेशन जळगाव यांनी स्वीकारली आहे.
महाबळ पासून गाडगेबाबा चौकानंतर उजव्या हाताला कोल्हे हिल्स कडे जाणाऱ्या रस्त्यावर हा उपक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता राबवण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी सह आयुक्त पंकज गोसावी,माजी नगरसेविका सौ.उज्वला बेंडाळे माजी महापौर,सौ.सीमा भोळे मनपा.पर्यावरण विभागाचे प्रमुख,प्रकाश पाटील.अशोक बागडदे,रवी चौधरी,डॉ.धनंजय बेंद्रे, निलेशभाई पटेल,बाहेती हायस्कूलचे मुख्यध्यापक पी.आर.जाधव,सुनील अग्रवाल,राजू पाटील,देवा ढेकळे,मनोज चौधरी,बंटी बूटवाणी,अनिल जोशी,रुपेश महाजन,रफिक पिंजारी,संतोष क्षीरसागर,एस.एस.पाटील,वसंत बाविस्कर,आर्किड नेचरचे आर.एन.कुलकर्णी,सचिव सौ.सुनीता महाजन,श्री.महाजन व त्यांचे सहकारी चंद्रजीत पाटील,डॉ.नरेंद्र सोनार,ईशानभाई,डॉ.कंचन वाणी,तनव वाणी वामन माळी,योगेश माळी,सतीश साळी व गुड ग्राउंड संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
एकूण 300 पंधरा फुटाचे मोठे झाडांची लागवड करण्यात येत आहे. सहा फुटाचा पिंजरा,अडीच फुटाचा पीव्हीसी पाईप मुळापर्यंत सोडून त्यात मध्ये हायड्रोजेल,सिंगल सुपरफॉस्पेट,बुरशीनाशक,थायमेट आणि नंतर पाईप मध्ये गोल गोटे भरून पाईप मुळाशी पुरला.या नावीन्यपूर्ण लागवडीमुळे दोन वर्षात झाडाची उंची दुप्पट वाढते मुळाशी पाणी पोहोचते व अत्यंत कमी पाण्यात झाड भराभर वाढते.यंदा प्रथमच या पद्धतीचा उपयोग ग्रीन सिटी फाउंडेशन जळगाव ने केलेला आहे.
