जळगाव – दि.३० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगाव फळ व भाजीपाला विक्री करणारी सहकारी मंडळी मर्यादित,जळगाव संस्थेच्या अध्यक्षपदी भालचंद्र शंकर चौधरी व उपाध्यक्ष पदी पद्मसिंग निळसिंग पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
दि.२८/०५/२५ रोजी दुपारी १२ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात बैठक घेण्यात आली. सुरुवातीस श्री भालचंद्र शंकर चौधरी यांची अध्यक्षपदी तसेच पद्मसिंग निळसिंग पाटील यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी नवनिर्वाचीत संचालक म्हणुन श्री शालीग्राम हरी काळे,रमेश रामकृष्ण पाटील,प्रमोद यशवंत खडके,जगन्नाथ पंढरीनाथ भंगाळे,अशोक हरी चौधरी, दिनेश विठ्ठल चौधरी,दिवाकर शंकर चौधरी,दिगंबर गोविंदा महाजन,प्रेमराज खिवराज खडके,दिनेश वसंत पाटील,प्रभाकर काशिनाथ पाटील,सौ.सुनंदा ध्न्यानदेव पाटील,सौ.नीता अजय नेमाडे हे सर्व उपस्थित होते.
तसेच संस्थेचे व्यवस्थापक अतुल शरद राणे,संस्थेचे कर्मचारी धनराज सावदेकर,अशोक महाजन,शैलेश भोळे ,सुकलाल बारी,पुरुषोत्तम खडके,रतीलाल बारेला समस्त कर्मचारी वृंद हजर होते. या वेळी नवनिर्वाचीत अध्यक्ष यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
संस्थेचे नवनिर्चित अध्यक्ष भालचंद्र शंकर चौधरी यांची सलग चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झालेली आहे.संस्थेचे समस्त शेतकरी सभासद वर्ग,संस्थेचे सर्व हितचिंतक , समस्त कर्मचारी वृंद यांच्या सर्वांच्या सुखदुःखात भालचंद्र चौधरी यांचे अमूल्य योगदान मिळत असते. सकारात्मक दृष्टिकोन,उत्कृष्ट संघटन क्षमता, सूजनात्मकता व योग्य वेळेचे व्यवस्थापन व अचुक निर्णय क्षमता आणि अफाट सामर्थ्य शक्ती यांच्या जोरावर दादांनी संस्थेच्या विकासासाठी अहोरात्र योगदान दिले.त्यामुळेच संस्थेला सतत ऑडिट वर्ग अ मिळत आहे.त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
जळगाव फळ व भाजीपाला विक्री सहकारी मंडळी मर्यादित…संस्थेच्या अध्यक्षपदी भालचंद्र शंकर चौधरी व उपाध्यक्ष पदी पद्मसिंग निळसिंग पाटील यांची बिनविरोध निवड.
RELATED ARTICLES
