बांभोरी :- दि.२२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) पाषाण कुशा एकादशीनिमित्त येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात गुरुवार, दि.२२ ऑक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने श्रींचा अभिषेक,विधिवत पूजन,भजन,आरती फराळ वाटप तसेच अन्य धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडणार आहेत.
एकादशीनिमित्त मंदिरात भाविक मोठ्या संख्येनं उपस्थिती देणार आहे.दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन श्रींचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत,असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने देवाचार्य यशवंत अण्णा पाटील आले आहे.या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून,भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
