Thursday, October 29, 2026
Homeअपघात..बांभोरी पुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तिघांचा जागीच मृत्यू..वनोली येथील यात्रा आटोपून झुरखेडेकडे...

बांभोरी पुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तिघांचा जागीच मृत्यू..वनोली येथील यात्रा आटोपून झुरखेडेकडे परतताना काळाचा घाला; गावावर शोककळा.

जळगाव – दि. १९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) – जळगाव शहराजवळील गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कार आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पंकज प्रकाश चौधरी, हरीश हिंमत चौधरी आणि रवींद्र अरुण चौधरी या तिघांचा जागीच मृत्यू झाला. हे तिन्ही तरुण एकमेकांचे नातेवाईक असून झुरखेडे (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघे तरुण भुसावळजवळील वनोली येथील यात्रा आटोपून आपल्या कारने झुरखेडे गावाकडे परतत होते.यावेळी बांभोरी पुलावर समोरून येणाऱ्या कंटेनरसोबत त्यांच्या कारची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला.

या दुर्घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून,झुरखेडे गावावर शोककळा पसरली आहे.

एकाच कुटुंबातील नातेवाईक असलेल्या तीन तरुणांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. बांभोरी पूल व परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर “अपघातांचे सत्र कधी थांबणार? ”असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या