जळगाव – दि.१६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क )
व.वा.जिल्हा वाचनालय आणि रोटरी क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यामाने वाचन प्रेरणा दिना निमित्त आयोजित रोटरी महावाचन अभियानाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रोटरीचे प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सहप्रांतपाल अनिल कांकरिया, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी,उपाध्यक्ष ॲड.सुशील अत्रे, कार्याध्यक्ष सी.ए.अनिलकुमार शाह,रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके, प्रोजेक्ट चेअरमन गिरीश कुलकर्णी,५६ वर्षापासून वाचनालयाचे सभासद असलेले सुरेश महाबळ या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. राजेश पाटील यांनी रोटरी महावाचन अभियान हा चांगला उपक्रम असून वाचनालयाची गिफ्ट कार्ड ही अभिनव संकल्पना असून रोटरी जळगाव परिवारातील सर्व क्लबला या विषयी प्रोत्साहित करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
कार्यक्रमात सुरेश महाबळ यांच्यासह वाचनालयाचे प्रदीर्घ काळापासून सभासद असलेले रामसिंग पाटील, बाळू गावंडे यांच्यासह तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सभासद असलेले अनिल जगताप, वसंत शिंदे, भास्कर महाजन, कृष्णा वीरकर, नितीन बापट यांना त्यांच्या घरातील युवा पिढीसाठी गिफ्ट कार्ड मान्यवरांच्या हस्ते भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी वाचनालयाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदस्यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक अनिलकुमार शाह यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.अपर्णा भट – कासार यांनी केले.सकाळी नऊ वाजेपासून शेकडो मान्यवर नागरिकांसह हजारो शालेय विद्यार्थ्यांनी वाचनालयात येऊन आपल्या आवडीचे पुस्तक घेऊन वाचन करीत अभियानात सहभाग घेतला.सहभागी वाचकांसाठी आकर्षक सेल्फी पॉईंट व स्वाक्षरी फलकाची व्यवस्था करण्यात आली होती.
रोटरी महावाचन अभियानाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. विद्यार्थी सह वाचक प्रेमी सहभागी…
RELATED ARTICLES
