Thursday, October 29, 2026
Homeजळगांव शहरलोक संवाद २०२६ अभियानांतर्गत शासनाच्या कल्याणकारी योजंनाचा प्रचार प्रसार मोहिमेचा नवी पेठे...

लोक संवाद २०२६ अभियानांतर्गत शासनाच्या कल्याणकारी योजंनाचा प्रचार प्रसार मोहिमेचा नवी पेठे गणेश मंडळ येथे शुभारंभ..


जळगांव -दि.२१-(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील बँक स्ट्रीट या मध्यवर्ती नवी पेठ परिसरात गणेश उत्सवाचे ५३ वे वर्ष साजरे करत असलेल्या खान्देशचा राजा या उपाधीने ओळखल्या जाणाऱ्या नवी पेठ गणेश मंडळ प्रांगणात जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमांतून शासनाच्या लोकसंवाद अभियान २०२६ प्रचार प्रसार मोहिमेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला .

या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार या कार्यक्रमासाठी नवी पेठ गणेश मंडळ अध्यक्ष मनीष झंवर,पदाधिकारी शैलेश काबारा,प्रदीप मणियार,सुनिल जोशी,युवा गर्जना ढोल ताशा पथक प्रमुख मधुर झंवर,कृष्णा सोनवणे ,अमोल जोशी,प्रसिध्दी प्रमुख प्रसाद जोशी,प्रमोद भंगाळे आदींची उपस्थिती होती.या प्रसंगी नवी पेठ गणेश मंडळाच्या जगन्नाथ पुरी ही भव्य आरास पहावयास आलेल्या गणेश भक्तांना परिसरातील रहिवासी,नागरिक यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.या अभियानाचा माध्यमातून प्रचार प्रसार करण्यात आला.

        लोक संवाद २०२६ अभियानातून
                        विशेष जनजागृती उपक्रम..

या अभियानाचे आयोजन १६ सप्टेंबर ते२४ सप्टेंबर या कालावधी दरम्यान करण्यात आले आहे. शासनाचे लोकसंवाद-२०२६’ अभियान हे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महा संचालनालया मार्फत १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यात राबवला जाणारा एक विशेष जनजागृती उपक्रम आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर, गणेश मंडळांच्या ठिकाणी एकत्र येणाऱ्या नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहिती थेट जनते पर्यंत….

कृषी, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, कौशल्य विकास, क्रीडा व युवक कल्याण, सहकार, पणन आदी विभागांच्या योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, शिष्यवृत्ती, आरोग्य योजना, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार यांसह महाडीबीटी, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार आणि आपले सरकार यांसारख्या विषयांवरही जनजागृती करण्यात येणार आहे.

        गणेश मंडळांनी संपर्क साधावा..

शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या तर्फे गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांना थेट व अधिकृत माहिती दिली जात आहे.लोकसंवाद-२०२६’मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेश मंडळांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरातील गणेश मंडळ येथे प्रत्यक्ष भेट देवून वरील कालावधीत हे अभियान उत्स्फूर्त स्वरूपात राबवले जाणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या