जळगांव – दि.१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)अमळनेर येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचालित शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बी.एड कॉलेज)येथून प्रदीर्घ अशा ३३ वर्षाची सेवा प्राध्यापक पदावरून अखंडित बजावत प्रा.डॉ.अंजली गोविंद कुलकर्णी या दि.३o जून रोजी सेवा निवृत्त झाल्या .
भावपूर्ण निरोप समारंभात त्यांना महाविद्यालय प्राध्यापक वर्ग,प्राचार्य यांच्यावतीने डॉ.अंजली कुलकर्णी यांचा सत्कार करून भावस्पर्शी निरोप देण्यात आला. तसेच त्यांच्या समवेत व्यासपीठा वर उपस्थित गोविंद कुलकर्णी,पत्रकार प्रसाद जोशी,यांचा देखील सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्राचार्य डॉ.पी.पी.चौधरी सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिशादायक मार्गदर्शन दर्जेदार ,गुणवत्ता पूर्वक समर्पित व कर्तव्यदक्ष भावनेने केलेल्या अध्यापन कार्याची आठवण सदैव येत राहिल,या विद्यालयाशी त्यांचे अतूट असे भावनिक नाते सदैव कायम राहील असा आशावाद व्यक्त केला.पुढील निरामय जीवनाच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
,प्रा.डॉ श्रीमती नयना वाणी,डॉ.जे.एन.चव्हाण, प्रा.के.वाय.देवरे,प्रा.डॉ.एस.सी.तायडे मॅडम, ग्रंथपाल प्रा.डॉ विजय गाढे,यांनी देखील आपल्या भावस्पर्शी मनोगतातून डॉ.अंजली कुलकर्णी यांच्या सहवासातील ३३ वर्षातील कार्य कर्तृत्वाच्या आठवणीना उजाळा दिला.यावेळी निरोपा विषयी भावना व्यक्त करताना सर्वांचा कंठ दाटून आला.
या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित पत्रकार धर्मसाथी, संपादक प्रसाद जोशी यांनी त्यांच्या भगिनी डॉ.अंजली कुलकर्णी यांच्या खडतर वाटचालीतून केलेल्या अभिमानास्पद संघर्षमय यशस्वी जीवन प्रवास उलगडत माहिती दिली.तसेच या निवृत्ती समारंभात सत्काराला उत्तर देताना डॉ.अंजली जोशी-कुलकर्णी यांनी महाविद्यालय सहकाऱ्यांनी,विद्यार्थ्यांनी दिलेले प्रेम, जिव्हाळा,आदर आपण कधीही विसरू शकणार नाही संस्थे प्रती कृतज्ञ राहून सर्वांच्या ऋणात राहील अशी भावना व्यक्त केली.
या प्रसंगी सहा.ग्रंथपाल श्रीमती विनिता पाटील, कार्यालयीन कर्मचारी,कैलास भोंगळ,किरण रावळ ,कार्यालयीन सेवा कर्मचारी राजू वाघ.विनोद सोनवणे व इतर कर्मचारी उपस्थित होते.या प्रमाणेच नवल भाऊ प्रतिष्ठान संचलित आय.टी. आय.संस्थेत देखील प्राचार्य बावीस्कर सर यांनी देखील डॉ.अंजली कुलकर्णी यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला.
एन.पी.एस.शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथून प्रतिभावान प्राध्यापिका डॉ.अंजली जोशी – कुलकर्णी सेवा निवृत्त..
RELATED ARTICLES
