Tuesday, July 7, 2026
Homeजळगांव शहरकाशी विश्वेश्वर मंदिरात ६ जुलै रोजी 'भक्तीनाद' भजन संध्येचे आयोजन.. भाविकांना दर्शनासह...

काशी विश्वेश्वर मंदिरात ६ जुलै रोजी ‘भक्तीनाद’ भजन संध्येचे आयोजन.. भाविकांना दर्शनासह स्वरसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील कोल्हेनगर परिसराजवळील प्रसिद्ध श्री काशी विश्वेश्वर मंदिर येथे सोमवार, दिनांक ६ जुलै रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता “भक्तीनाद” भजन संध्या ग्रुपतर्फे भव्य भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पवित्र वाराच्या पार्श्वभूमीवर आयोजित या भक्तीमय सोहळ्यात अनेक नामांकित कलाकार देवचरणी आपली स्वरसेवा अर्पण करणार आहेत.या सुश्राव्य भजन संध्येत जळगावातील प्रसिद्ध गायक निलेश पाटील, ज्येष्ठ कलावंत व निवेदक तुषार वाघुळदे, गायिका वृंदा पालखे,राखी हेडा आणि प्रवीण पाटील हे कलाकार आपल्या सुरेल आवाजाने आणि भक्तीगीतांनी परिसराला मंत्रमुग्ध करणार आहेत.अतिशय शांत आणि नयनरम्य परिसर जुने रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या मागे, माजी महापौर ललित कोल्हे यांच्या बंगल्याजवळ (भगवान  नगरजवळ), जळगाव येथे हे मंदिर वसलेले आहे.

श्री काशी विश्वेश्वर मंदिर हे अत्यंत स्वच्छ,शांत आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे संपूर्ण जळगाव शहरातून आणि परिसरातून शिवभक्त येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. या पवित्र वातावरणात होणारा भजनाचा कार्यक्रम भाविकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.या भक्तीनाद भजन संध्या कार्यक्रमाचा परिसरातील सर्व आबालवृद्ध नागरिक, शिवभक्त आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे भावपूर्ण आवाहन “भक्तीनाद” ग्रुपचे तुषार वाघुळदे व मंगला पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या