जळगाव – दि.३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंधक) पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समिती सदस्य म्हणून नुकतीच सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांची नियुक्ती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.स्वप्नील सांगळे यांनी केली आहे.
समितीच्या सदस्यांनी आवश्यक असेल तेव्हा सोनोग्राफी सेंटर तपासनीस सहकार्य करणे,होणाऱ्या बैठकींना आवर्जून उपस्थित राहणे,स्रीभ्रूण हत्या टाळणे,त्या होऊच नये,मुलींचा जन्मदर वाढवा म्हणून जनजागृती कार्य करणे.असे कार्य समिती सदस्य म्हणुन अपेक्षित आहे.
मुकुंद गोसावी यांची पीसीपीएनडीटी जिल्हा स्तरीय समितीवर नियुक्ती
RELATED ARTICLES
