Tuesday, July 7, 2026
Homeजळगांव शहरजिल्हाधिकारी, मनपा आयुक्त,अधिकारी मतदारांच्या घरी पोहोचले.. बळीराम पेठेतील प्रभागात २...

जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त,अधिकारी मतदारांच्या घरी पोहोचले.. बळीराम पेठेतील प्रभागात २ ठिकाणी भेट देत प्रत्यक्ष कामाची पाहणी…

जळगाव : – दि.२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणमोहिमेला वेग आला असून, पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे आणि अपात्र मतदारांची नावे वगळणे या उद्देशाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ३० जूनपासून घराघरांत जाऊन पडताळणी करीत आहेत.या मोहिमेच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी. बुधवारी  दि.१ जुलै रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे आणि महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांनी बळीराम पेठ भागात कमलाकर फडणीस प्रबोध चंद्रिका कार्यालय येथे भेट देत बीएलओं सोबत नागरिकांच्या घरी जाऊन सुरू असलेल्या प्रक्रियेची पाहणी केली.या प्रसंगी या कार्याला गती देण्यासाठी भाजप महानगर तर्फे सहकार्य करणारे भाजप जेष्ठ कार्यकर्ते उदय भालेराव , प्रेमल पटेल,प्रमोद निकुंभ आदींची उपस्थिती होती.निवडणूक उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, रूपाली काळे आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनीही बीएलओंसोबत विविध भागांत जाऊन घरभेटी दिल्या. व या कामाची माहिती घेतली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या