Tuesday, March 3, 2026
Homeताज्या बातम्याजळगावच्या सुपुत्राला दादासाहेब फाळके अवार्ड– बॉलिवूडमध्ये ‘रायझिंग स्टार’ म्हणून स्वप्नील शिंदेचा गौरव..

जळगावच्या सुपुत्राला दादासाहेब फाळके अवार्ड– बॉलिवूडमध्ये ‘रायझिंग स्टार’ म्हणून स्वप्नील शिंदेचा गौरव..

जळगाव – दि.२४(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
जळगावसाठी अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे शहरातील होतकरू तरुण स्वप्नील शिंदे यांना दादासाहेब फाळके पुरस्कार (रायजिंग स्टार इन बॉलिवुड)प्रदान करण्यात आला आहे.हा मानाचा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका बेदी यांच्या हस्ते हॉटेल सहारा स्टार येथे आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.कल्पना शिंदे आणि रामकृष्ण रामदास शिंदे (माजी लाईन चेकिंग ऑफिसर, जळगाव) यांचे सुपुत्र असलेल्या स्वप्नील यांनी आपल्या कुटुंबाचे आणि जळगावचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. साध्या कुटुंबातून येऊनही जिद्द,मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.इंजिनिअरिंग आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.सध्या ते पुण्यातील एका अग्रगण्य कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत.नोकरीसोबतच घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आपल्या अभिनयाच्या आवडीला सातत्याने जोपासले आणि स्वप्नांच्या दिशेने ठाम पावले टाकली.मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रात सक्रिय राहून त्यांनी विविध प्रोजेक्ट्समध्ये सहभाग घेतला आहे. त्यांची मेहनत, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच त्यांना बॉलिवूडमध्ये‘रायझिंग स्टार’ म्हणून गौरविण्यात आले.हा पुरस्कार त्यांच्या यशस्वी प्रवासातील एक महत्त्वाचा आणि प्रेरणादायी टप्पा मानला जात आहे.पुरस्कार स्वीकारताना त्यांनी आपल्या आई-वडिलांचे, कुटुंबीयांचे आणि सर्व शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार मानले.“हा पुरस्कार माझ्या कुटुंबाचा,माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आणि माझ्या जळगाव शहराचा आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.जळगाव शहर त्यांच्या या उल्लेखनीय यशाचा अभिमान बाळगत असून तरुणांसाठी ते एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे जळगावच्या सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रातील योगदानाला नवी ओळख मिळाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या