Saturday, June 13, 2026
Homeनिधन वार्ता..जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक विनोद शांताराम पाटील यांचे निधन

जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक विनोद शांताराम पाटील यांचे निधन

जळगांव – दि.२४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगाव जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री.विनोद शांताराम पाटील (वय ५० वर्षे) यांचे शनिवार,दि.२३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. 

बैलपोळ्याच्या सुट्टीच्या दिवशी शासकीय निवासस्थानी असताना त्यांना मेंदूत रक्तस्राव (ब्रेन हॅमेरेज) झाला.घरच्यांनी त्यांना भंगाळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते;मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात हलविण्यात आले.तेथे उपचार सुरू असतानाच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज रविवारी दि.२४ ऑगस्ट रोजी अकरा वाजता पाचोरा येथे अंत्यविधी होणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या