Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरन्याय विश्वास फाउंडेशन आयोजित तिसऱ्या मोफत कायदे विषयक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..८०० हून...

न्याय विश्वास फाउंडेशन आयोजित तिसऱ्या मोफत कायदे विषयक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..८०० हून अधिक गरजवंतानी घेतला लाभ..

जळगांव – दि.२४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)न्याय विश्वास फाउंडेशन’च्या वतीने दि.२३ रोजी जळगाव (मेहरूण) येथे आयोजित तिसऱ्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला.केवळ जळगावच नव्हे,तर मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर,अहिल्यानगर,धुळे ते बीड अशा संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल ८०० पेक्षा अधिक नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला.सर्वसामान्यांनी दाखवलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच फाउंडेशनच्या कार्याची खरी पोचपावती असल्याचे अनिकेत निकम यांनी सांगितले.फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड.अनिकेत उज्ज्वल निकम यांच्या नेतृत्वाखाली, तज्ज्ञ वकिलांच्या टीमने कौटुंबिक वाद,मालमत्ता व जमिनीचे प्रश्न, ७/१२ उताऱ्याच्या अडचणी, आर्थिक फसवणूक,सायबर गुन्हे आणि कोर्टातील प्रलंबित केसेस यांवर नागरिकांना मोफत व सोप्या भाषेत कायदेशीर मार्गदर्शन केले.या प्रसंगी आ.राजू मामा भोळे,जयश्री सुनिल महाजन,राजेंद्र घुगे पाटील यांचेसह सर्व लोक प्रतिनिधी,ज्येष्ठ समाजसेवक,पत्रकार आणि राज्यभरातून आलेल्या सर्व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कायद्याची योग्य माहिती आणि न्याय पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न असेच अविरत सुरू राहतील अशी माहिती फाउंडेशन वतीने देण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या