Tuesday, July 28, 2026
Homeजळगांव शहरमोहाडी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम.. महाराष्ट्र गवळी समाज संघटने तर्फे आयोजन..सहकार्याचे मानले आभार..

मोहाडी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम.. महाराष्ट्र गवळी समाज संघटने तर्फे आयोजन..सहकार्याचे मानले आभार..

जळगांव – दि.१८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) निसर्ग मित्र,जिल्हा केमिस्ट संघटनेचे पदाधिकरी विलास बरडे यांनी गवळी समाजाच्या स्मशान भूमीसाठी व धार्मिक मंदिरांसाठी वृक्षा रोपण करण्याकरिता ७० रोपे माझे शहर माझी जबाबदारी अभियानात मिळवून देत अनमोल सहकार्य केल्याची भावना दिलीप गवळी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र गवळी समाज संघटना यांनी व्यक्त केली आहे.

लवकरच हा वृक्षारोपण कार्यक्रम मोहाडी परिसरात राबवला जाणार आहे.या उपक्रमात रोपे जमा करताना सोबत संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.निंबाप्पा जानगवळी सोबत महाराष्ट्र प्रदेशचे युवा सहसचिव संतोष जानगवळी,युवा जिल्हा अध्यक्ष उमेश गटरी,तालुका सचिव विजय जानगवळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ला.ना.शाळा ग्रुपचे माजी विद्यार्थी ,धडाडीचे कार्यकर्ते विलास बर्डे यांनी आम्हाला वृक्षारोपण करण्यासाठी जे मोलाचे सहकार्य केले त्या बद्दल महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे सामाजिक वनीकरण विभाग ,मनपा प्रशासन व त्यात सक्रिय सहभाग देणारे विलास बर्डे यांचे आभार मानण्यात आले.निसर्ग सेवा करण्याकरिता निस्वार्थ सुरु असलेले त्यांचे कार्य उंचावत जावे अश्या शुभेच्छा संघटनेतर्फे या प्रसंगी त्यांना देण्यात आल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या