नशिराबाद – दि.११ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते,ॲड.प्रदीप देशपांडे यांची भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिमच्या जिल्हा उपाध्यक्ष(कायदा आघाडी) पदी निवड झाली.
भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिमच्या कायदा आघडीच्या उपाध्यक्षपदी निवडी बद्दल नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन,जळगावचे आमदार राजू मामा भोळे आमदार मंगेश चव्हाण,जिल्ह्याचे राज्यसभा खासदार ॲड.उज्वल निकम,खासदार स्मिताताई वाघ.भाजपा जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी,जळगाव जिल्हा कायदा आघाडीचे अध्यक्ष ॲड. मधुकर भीमराव देशमुख (एरंडोल) भाजपा जळगाव तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील,नशिराबाद नगरपरिषदेचे लोक नियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व गटनेते तथा नगरसेवक लालचंद पाटील,
नशिराबाद भाजप शहराध्यक्ष प्रदीप बोढरे,शहर सरचिटणीस राजू पाचपांडे सर, जितेंद्र महाजन सर,जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सागर चित्रे,जळगाव मनपाचे ज्येष्ठ विधीज्ञ आनंद मुजुमदार,सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रत्नाकर पांढरकर,कार्याध्यक्ष जनार्दन माळी,खंडारे सर तसेच ब्राह्मण संघ व परशुराम बहुभाषिक ब्राह्मण संघ नशिराबाद,एकता मित्र मंडळ,सार्वजनिक वाचनालय , नशिराबाद शिक्षण मंडळ आदींनी श्री देशपांडे यांच्या निवडीचे अभिनंदन केले आहे.
ॲड.प्रदीप देशपांडे यांची भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिमच्या जिल्हा उपाध्यक्ष(कायदा आघाडी) पदी निवड.
RELATED ARTICLES
