Friday, June 12, 2026
Homeजळगांव शहर१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित स्वयंस्फूर्त रक्तदान करण्याचे आवाहन... मुकुंद...

१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित स्वयंस्फूर्त रक्तदान करण्याचे आवाहन… मुकुंद गोसावी (शतकवीर रक्तदाता) ब्रॅण्ड ॲम्बेसेडर – रक्तदान जनजागृती कार्य..”एक रक्तदान देईल अनेक गंभीर पीडितांना जीवनदान.

जळगाव -दि.१२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) थॅलेसीमिया,हिमोफिलिया,सिकलसेल, रक्तक्षय व अशक्त महिला,गर्भवती असलेल्या तसेच प्रसूतीस्तव येणाऱ्या माता,लहान मोठ्या होणाऱ्या शस्त्रक्रिया,अपघात ग्रस्त गंभीर रुग्णांना सतत मोठ्या प्रमाणात सुरळीत रक्त पुरवठा आवश्यक असून सद्या तप्त उन्हाळा ,बदलते वातावरण या मुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच रक्त संकलन करणाऱ्या रक्तकेंद्रात रक्ताची भीषण समस्या निर्माण झाली असल्याने सुरळीत रक्त पुरवठा न झाल्यास गंभीर रुग्णांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते.कुठल्याही गंभीर रुग्णांना त्रास होऊ नये याकरिता सुरळीत रक्तसाठा उपलब्ध होण्या साठी रक्तदान शिबिरांची,रक्तदात्यांची नितांत गरज आहे,

आपल्या रक्तदानाने गंभीर रुग्णांना नव जीवनदान मिळते.याकरिता १८वर्षांवरील कुणीही ५० किलो वजनदार सहज करू शकता रक्तदान. अत्याधुनिक यंत्र आल्याने एका रक्तदानातून विविध घटक तयार केले जातात त्यामुळे एका रक्तदानातून आपण अनेकांना जीवनदान देतो. रक्तदानानंतर कुठल्याही विशेष मेनू ,आहाराची गरज लागत नाही जे आपण नेहमी भाजी, भाकर,पोळी खातो तेही चालतं, रक्तदान करण्यास अल्पसा वेळ लागतो,आपल्यात रक्त साठा अपार असतो आपण रक्तदान करताना थोडेच रक्त देतो त्यांमुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही,रक्तदान करण्याने अशक्त पणा,कमजोरी अजिबात येत नाही तर दिलेले रक्तही नव्या स्वरूपात लगेच निर्माण होते.जिल्ह्यातील आपल्या सारख्या संवेदनशील व्यक्ती,सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संस्था, पदाधिकारी,कार्यकर्ते आस्थापना आदींनी रक्तदान शिबिर आयोजित केल्यास गंभीर रुग्णांना मोठी मदत होईल,

मला पोलिओ आजाराने ७०% प्रतिशत शारीरिक व्यंग असूनही माझ्या सशक्त,सुदृढ मनाने जवळपास १०० पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले आहे.मला कुठलाही त्रास नाही तर नेहमी प्रसन्न,स्फूर्ती वाटते.रक्तदान करण्याचे सर्वांना जाहीर आवाहन मुक्ती फाउंडेशन तर्फे मुकुंद गोसावी रक्तदान सेवा कार्यकर्ता,जळगाव यांनी पत्रकान्वये केले आहे.

१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित दिव्यांग विक्रमी रक्तदाता मुकुंद गोसावी यांनी रक्तदान जनजागृती गीत तयार केले असून त्याचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या