Saturday, September 12, 2026
Homeजळगांव शहरस्वामी प्रियाशरणजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथेचे पांजरपोळ गो शाळेत...

स्वामी प्रियाशरणजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथेचे पांजरपोळ गो शाळेत भव्य आयोजन..


जळगांव – दि.१७ (धर्मसाथी मिडिया नेटवर्क) शहरातील श्रद्धाळू भक्तांसाठी एक अध्यात्मिक पर्वणी परम श्रद्धेय स्वामी श्री प्रियाशरणजी महाराज यांच्या पावन मुखारविंदातून संपन्न होणारी श्रीमद् भागवत कथा येत्या १९ जुलै ते २७ जुलै २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ही कथा दररोज दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, पांजरापोल गोशाला, लक्झरी बस स्टँडजवळ, नेरी नाका,जळगांव येथे होणार आहे.कार्यक्रमाची सुरुवात १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता भवानी मंदिर येथून निघणाऱ्या भव्य कलश यात्रेने होणार असून,या शोभायात्रेचे समारोप स्थळ पांजरापोल गो शाळा असेल.यात्रेत महिला, युवक, वंदन पथक व स्थानिक भक्तगण सहभागी होणार असून संपूर्ण मार्गात भजन,कीर्तन व ढोल-ताशांचे गजर होणार आहेत.स्वामी श्री प्रियाशरणजी महाराज यांची वाणी भक्तांचे जीवन आध्यात्मिक दृष्टिकोनातून समृद्ध करणारी असून, त्यांच्या श्रीमुखातून श्रवण केल्यास जीवनात शांती, भक्ती व सकारात्मक परिवर्तन अनुभवता येते, असा अनुभव यापूर्वी शेकडो ठिकाणी घेण्यात आलेला आहे.या पावन कथेस उपस्थित राहून सर्व भाविकांनी आपल्या कुटुंबासह या अध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.अधिक माहिती साठी आयोजक,राधा गोविंद सेवा समिति, जळगांव संपर्क: 8390316185 यावर संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या