जळगाव, दि. १५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) — स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला स्वरवेध फाउंडेशन तर्फे चैतन्यनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघात ‘भारत हमको जान से प्यारा है’या संकल्पनेवर आधारित देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.‘जयोस्तुते जयोस्तुते’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.भागवत पाटील व निळकंठ कासार यांनी हे गीत सादर केले.त्यानंतर ऐ प्रीत जहाँ की रीत सदा,मेरा रंग दे बसंती चोला, संदेशे आते हैं, गंगा मेरी माँ का नाम, ऐ वतन ऐ वतन हमको तेरी कसम,राष्ट्रदेवतांचे, जहाँ डाल डाल पर,भारत हमको जान से प्यारा है, ये देश है वीर जवानों का, हर करम अपना करेंगे, ऐ मेरे वतन के लोगों, ऐ मेरे प्यारे वतन यांसह विविध देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले.
या गीतांमध्ये निळकंठ कासार, भागवत पाटील, जगदीश पाटील,नसीम तडवी,रविंद्र कदम, अंजली धुमाळ, सुधाकर अंभोरे, हेमंत बारी, अजित भालेराव, हर्षल तिवारी, शेखर पंजवानी, प्रकाश सोनवणे, बापूसाहेब पाटील, ज्योती राणे, मंजू अग्रवाल, सत्यनारायण खटोड व भालचंद पाटील यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संपूर्ण निवेदन श्रीमती ज्योती राणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र खडके, युवराज चौधरी, रत्नाकर वाणी, सुशीलकुमार साळुंखे, खंडू वामनराव राणे व ॲड. अरुण धांडे यांचे सहकार्य लाभले. कराओके ट्रॅक सिस्टम प्रा. भालचंद पाटील यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी‘बलसागर भारत होवो’ ही भैरवी निळकंठ कासार व भागवत पाटील यांनी सादर केली. देशभक्तीच्या गीतांनी भारावलेल्या या मैफलीला श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
