जळगाव – दि.१३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)१४ जून रविवारी स्वरवेध फाउंडेशन तर्फे हिंदी गजलांचा कार्यक्रम तहसीलदार कार्यालया जवळील पत्रकार भवन मधील तळ मजल्यावरील हॉल मध्ये संध्याकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात भागवत पाटील, निळकंठ कासार, सौ अंजली धुमाळ, संजय कोरान्ने, रवींद्रकुमार बावणे, राजेंद्र सराफ, सत्यनारायण खटोड, कांचन तायडे सौ जयश्री चिंचोले,भालचंद्र पाटील, मसूद शेख हे गायक विविध प्रकारचे गजल गाणार आहेत हा कार्यक्रम कराओके ट्रॅक वर सादर करण्यात येणार आहे निवेदन डॉ कवी श्री अशोक पारधे करणार आहे सौजन्य श्री भरत खडके व राहुल तोडकरी बिल्डर सत्यनारायण खटोड( विकासक ) व हरीश खडके यांचे आहे.तरी संगीत प्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वरवेध फाउंडेशन तर्फे हिंदी गजल कार्यक्रम..पत्रकार भवनात आयोजन..
RELATED ARTICLES
