जळगांव – दि.१६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी सदृश्य असा शाळेचा देखावा तयार केला.आई मुलाला शाळेत आणत असून शिक्षकांकडे सुपुर्द करत आहे.असा जिवंत देखावा सादर केला. विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.
प्लास्टिकमुक्त अभियाना अंतर्गत बॅन्डपथकासह शालेय परिसरात रॅली काढण्यात आली.संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. सुशील अत्रे यांनी विद्यार्थी व पालक यांना नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभेच्छा संदेश दिला. या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री. अभिजित देशपांडे, सहसचिव सौ. मिरा गाडगीळ, विद्या समिती प्रमुख प्रा. शरच्चंद्र छापेकर, संस्थेचे सदस्य श्री. पंकज अत्रे, श्री. पारसमल कांकरिया, समन्वयिका सौ.लता छापेकर मुख्याध्यापिका सौ. सुषमा साळुंखे आदि मान्यवर उपस्थित होते.
प्लास्टिकमुक्त अभियानाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. गिरीष पाटील हे देखील उपस्थित होते. श्री किशोर सोनवणे यांनी प्लास्टिक मुक्त शाळा अभियान याविषयी माहिती सांगितली विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. इ.3 री मंथन व १० वी परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्री. योगेश वंजारी यांनी केले तर आभार दिलीप बारी यांनी मानले.
सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये “शाळा प्रवेशोत्सव” मोठ्या उत्साहात..
RELATED ARTICLES
