जळगाव-दि.२८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ.सु.ग.देवकर प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची’सुरक्षित वाहतूक “या विषयावर परिवहन समितीची सभा संपन्न झाली.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
सदर सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा साळुंखे होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहर पोलीस वाहतूक शाखा मा.श्री. सुमेरसिंग करमसिंग चौहान मोटार वाहन सहायक उपनिरीक्षक सौ.अश्विनी जोगदंड,वीर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे,जेष्ठ शिक्षक किशोर सोनवणे यांची विशेष उपस्थित होती.
सुमेरसिंग चव्हान यांनी रिक्षा चालक यांना मोटार वाहन कायदयानुसार नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.सौ.अश्विनी जोगदंड यांनी वाहन चालवताना घ्यावयाची काळजी,विद्यार्थी सुरक्षित वाहतुक,वाहन चालक यांचे आरोग्य या विषयी मार्गदर्शन केले.
दिलीप सपकाळे यांनी वाहतूक नियमांच पालन करून वाहतूक प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच रिक्षाचालक यांचे विविध समस्या व आरोग्याचे महत्व व या समस्यांचे निराकरण वाहतुक शाखेने करावे’असे सुचविले.मुख्याध्यापिका सौ.सुषमा साळुंखे यांनी विद्यार्थी सुरक्षित वाहतूक नियमावली समजावून सांगितली.सभेचे सुत्रसंचलन अजय भिरुड तर आभार किशोर सोनवणे यांनी मानले.
सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये परिवहन समितीची सभा उत्साहात ..
RELATED ARTICLES
