Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरसौ.सु.ग.देवकर प्रायमरी स्कूल मध्ये ज्येष्ठ विधिज्ञ कै. ॲड.अ.वा.अत्रे यांच्या जयंती निमित्त सुंदर...

सौ.सु.ग.देवकर प्रायमरी स्कूल मध्ये ज्येष्ठ विधिज्ञ कै. ॲड.अ.वा.अत्रे यांच्या जयंती निमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा.. इ.३री,४थी एम.टी.एस व मंथन स्पर्धा परीक्षा वर्गाचे उद्‌‌घाटन

जळगांव – दि.२८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शि.प्र.मंडळ संचालित सौ.सु.ग.देवकर प्रायमरी स्कूल मध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी कार्याध्यक्ष कै, ॲड.अ.वा.अत्रे जयंती निमित्त इ.१ ली ते इ.४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै.ॲड.अ.वा.अत्रे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी शि.प्र.मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड.सुशील अत्रे,संस्थेचे सचिव अभिजीत देशपांडे संस्थेचे सदस्य व विद्या समिती प्रमुख प्रा.शरच्चंद्र छापेकर संस्थेचे सदस्य ॲड.पंकज अत्रे,संस्थेच्या विश्वस्त व समन्वयिका प्रमुख सौ.पद्मजा अत्रे,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुषमा साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इ.३री, इ. ४ थी MTS व मंथन स्पर्धा परीक्षा वर्गाचे उद्‌घाटन करण्यात आले. प्रा.शरच्चंद्र छापेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा समिती प्रमुख व शिक्षक प्रतिनिधी श्री.जितेंद्र वानखेडे यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शितल वारुळकर व आभार श्री.दिलीप बारी यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या