जळगांव – दि.२२ (धर्मसाथी मिडिया नेटवर्क)
शि.प्र. मंडळ संचलित सौ.सु.ग.देवकर प्रायमरी स्कूलमध्ये’योगदिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.या आयोजनात विद्यार्थ्यांनी योगाभ्यास करून अनुभूती घेतली.
याप्रसंगी भारतीय योग संस्थान नवी दिल्ली द्वारा संचलित निशुल्क योग वर्ग महात्मा गांधी उद्यान जळगाव येथील योगतज्ज्ञ सुनंदा बाबूराव तायडे सौ.स्मिता संदीप कासार,सौ विद्या नितीन गायकवाड सौ.मिनाक्षी राजेश चव्हाण कु.कोमल राजेश चव्हाण कु. हेमांगी प्रकाश इंगळे यांनी योगाचे प्रात्यक्षिक व नियमित सराव या विषयी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी ‘योगदिन’ निमित्त घोषवाक्य म्हटली. शाळेतील सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी पालक यांनी योगासने केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. योगेश वंजारी व आभार श्री. किशोर सोनवणे यांनी आभार मानले.
सौ.सु.ग.देवकर प्रायमरी स्कूलमध्ये’योगदिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा..
RELATED ARTICLES
