Saturday, September 12, 2026
Homeजळगांव शहरसेवा भारतीच्या माध्यमातून जळगावात कार्यरत रुग्ण साहित्य केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा..

सेवा भारतीच्या माध्यमातून जळगावात कार्यरत रुग्ण साहित्य केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा..

जळगांव – दि.२२ (धर्मसाथी मिडिया नेटवर्क)
सेवा भारतीच्या माध्यमातून विविध उपक्रमा अंतर्गत गरजू रुग्णांसाठी वाटचाल करीत असलेल्या जळगांव जिल्ह्यातील पहिल्या सुरू केलेल्या रुग्ण साहित्य केंद्राचा वर्धापनदिन विसनजी नगरातील गायत्री मंदिर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.जळगांव जिल्ह्यात पाचोरा,झिपरु आण्णा नगर, भडगांव,चाळीसगाव,पारोळा,अमळनेर,धरणगाव या ठिकाणी सेवा भारती अंतर्गत रुग्ण उपयोगी साहित्य केंद्र सुरू आहे.त्यातून सातत्याने रुग्णांना रुग्ण उपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यात येते.त्यात जळगांव येथील रुग्ण साहित्य केंद्र जळगांव जिल्ह्यातील सर्व प्रथम सुरू करण्यात आलेले केंद्र आहे.ह्या केंद्रा मार्फत शहरात रोज अनेक रुग्णांना उपयोगी साहित्य पुरविले जाते.जळगांव येथील रुग्ण साहित्य केंद्राचे वर्धापनदिनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जळगांव नगरीचे मा.महापौर सौ.दीपमाताई काळे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगांव येथील प्रसिद्ध डॉ.श्री.राजेशजी दाभी होते.व्यासपीठावर सेवा भारतीचे प्रांत कोषाध्यक्ष श्री.बाळासाहेब खानविलकर ,सेवा भारती जिल्हाध्यक्ष मनीषजी काबारा,जिल्हा सचिव संदीप कासार यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून महापौर सौ.दीपमाला काळे यांनी सेवा भारतीच्या समाज उपयोगी कार्यक्रमा बद्दल समाधान व्यक्त करीत पुढील काळात या प्रेरणादायी कार्याला सहकार्य करण्याबाबत सांगितले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव संदीप कासार यांनी केले.त्यात त्यांनी समाजा कडून घेणे व परत समाजासाठी परत करणे, समाजातील दात्याकडून होत असलेल्या सहकार्य या बद्दल माहिती सांगितली.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विशाल जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन देवेन्द्र सूर्यवंशी यांनी केले.जळगांव शहरात आपणास मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी जळगांव शहरातील नागरिकांची मदतीची गरज असल्याचे आवाहन देखील या वेळी करण्यात आले.सदर कार्यक्रमात रुग्ण साहित्य केंद्र सांभाळणारे विनायक वाणी,व प्रल्हाद पाटील यांचा महापौर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.सदर प्रसंगी केमिस्ट भूषण सुनील भंगाळे,भगवती प्रसाद मुंदडा,अरुण जोशी,विजय मोघे,सोमनाथ महाजन,उद्योजक विकास महाले,अविनाश कुलकर्णी जेष्ठ स्वयंसेवक अनिल तारे.विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या